भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी आज सात अर्ज दाखल
- आतापर्यंत सहा उमेदवारांचे नऊ अर्ज दाखल
- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : भंडारा - गोंदिया सार्वत्रिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज चार उमेदवारांनी सात अर्ज दाखल केले. आतापर्यंत सहा उमेदवारांनी एकूण नऊ नामांकन अर्ज दाखल केले आहे.
आज मंगळवारी अजयकुमार भारतीय, सुमित पांडे, वीरेंद्र कुमार जयस्वाल, विलास राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. आज २४ उमेदवारांनी एकूण ५१ अर्जांची उचल केली. आतापर्यंत ९८ इच्छूकांनी २०२ अर्ज उचल केली आहे.
नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याचा उद्या बुधवार शेवटचा दिवस आहे. उद्या सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे सादर करता येतील. २८ मार्च रोजी नामनिर्देशनपत्रांची छानणी करण्यात येणार आहे. ३० मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
News - Bhandara