महत्वाच्या बातम्या

 लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत ८५ वर्षावरील मतदारांना घरपोच मतदान करण्याची सुविधा


- फॉर्म १२ डी भरुन देणे आवश्यक

- मतदान केंद्रावर येणाऱ्या जेष्ठ नागरिकांना खास सुविधा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : भारत निवडणूक आयोगाने ज्येष्ठ नागरिकांसाठी (मतदारांसाठी) काढण्यात आलेल्या आदेशात सुधारणा केली असून आता ८० ऐवजी ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना घरपोच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

या व्यतिरिक्त मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी येणाऱ्या जेष्ठ नागरिकांना मतदान केंद्रावर खास सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. जेष्ठ नागरिकांसाठी मतदानाची वेगळी रांग असणार असून यावेळी त्यांना मतदान केंद्रावरील स्वयंसेवक मदत करणार आहे. स्वतंत्र वाहन पार्किंगची व्यवस्था, पिण्याचे पाणी, वेटींग शेड, प्राथमिक चिकित्सा बॉक्स इत्यादी सुविधा पुरविण्यात येणार आहे.

८५ पेक्षा जास्त वय असलेल्या पात्र मतदारांना त्यांच्या मागणीनुसार घरपोच मतदानाचा पर्याय वापरण्यासाठी फॉर्म १२ डी प्रदान केला जाणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया जिल्हा निवडणूक अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्यास्तरावरून बिएलओ यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील आर्वी, देवळी, हिंगणघाट व वर्धा या चारही विधानसभा मतदारसंघाचे मतदार यादीमध्ये ज्येष्ठ नागरिक असलेल्या ८६ ते १२० वयोगटातील एकूण १५ हजार ८७२ मतदारांपैकी ७ हजार १७७ पुरूष तर ८ हजार ६९५ महिला मतदारांचा समावेश आहे.

मतदारांनी लोकशाहीच्या महोत्सवात सहभागी होऊन २६ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा वर्धा लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos