डॉ. बंग दांपत्य ‘गार्डियन्स ऑफ ह्युमनिटी’ पुरस्काराने माऊंट अबू येथे सन्मानित


-  मानवाधिकार व सामाजिक कार्याची दाखल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयालद्वारे डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांना ‘गार्डियन्स ऑफ ह्युमनिटी’ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राजस्थानमधील माऊंट अबू येथील विश्वविद्यालयाच्या जागतिक मुख्यालयात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. राणी बंग यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
माऊंट अबू येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयालयाच्या मुख्यालयात स्पिरीचुअलिटी  फॉर युनिटी, पीस अँड प्रोस्पेरिटी(ऐक्य, शांती आणि समृद्धीसाठी अध्यात्म) या विषयावर जागतिक शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. जगभरातून १५,००० प्रतिनिधी या परिषदेसाठी आले होते. अध्यात्माच्या माध्यमातून जगात कशाप्रकारे शांतता नांदविता येईल व ऐक्य प्रस्थापित करता येईल या विषयावर विविध सत्रांमध्ये चर्चा परिषदेत झाली. परिषदेत ‘गार्जियन्स ऑफ ह्युमनिटी’ हा मानाचा पुरस्कार देण्यासाठी डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांना निमंत्रित करण्यात आले होते. डॉ. बंग दांपत्याने मानवाधिकार आणि जगाला पूर्वीपेक्षा अधिक चांगले बनविण्याच्या दृष्टीने केलेल्या प्रामाणिक आणि समर्पित सेवेसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विश्वविद्यालयाच्या प्रमुख डॉ. जानकी दिदी आणि उपप्रमुख बी. के. हिरदया मोहिनी यांच्या हस्ते दोघांच्या वतीने डॉ. राणी बंग यांनी हा पुरस्कार स्वीकारला. दुर्गम आदिवासी भागांमध्ये तीन दशकांपासून अधिक कालावधीपासून आरोग्य आणि सामाजिक सेवा देत आहेत. या सेवेसोबतच समाजात आदर्श मूल्ये प्रस्तापित करून चांगला बदल घडवून आणण्यासाठी डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी दिलेले योगदान फार मोलाचे आहे, अशी असल्याची भावना यावेळी आयोजकांनी व्यक्त केली.    Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-05


Related Photos