शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आमदार कृष्णा गजबे यांनी दाखल केले नामांकन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज :
  आरमोरी विधानसभा क्षेत्राचे भारतीय जनता पार्टी, शिवसेना,  रिपाइं महायुतीचे  अधिकृत उमेदवार आमदार कृष्णा  गजबे यांनी आज ३ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. 
अर्ज  भरण्यासाठी जाताना भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी उपविभागीय कार्यालयात प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. अर्ज दाखल करतांना  खासदार अशोक नेते, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य तथा गडचिरोली चे जिल्हाध्यक्ष किसन  नागदेवे, जि. प.  अध्यक्षा योगिताताई भांडेकर, भाजपचे प्रदेश सदस्य तथा जि. प.  चे कृषी सभापती नाना  नाकाडे, शिवसेना चे आरमोरी विधानसभा प्रमुख व भाजपचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-03


Related Photos