महत्वाच्या बातम्या

 बर्ड फ्लू मुळे आरोग्य विभागाकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : नागपूर प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र येथील कोंबड्यांची मरतुक एव्हियन इन्फ्ल्युएन्झा (बर्ड फ्लू) मुळे झाल्याचे आढळून आल्याने घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही. भारतामध्ये पक्षातील बर्ड फ्लू मानसांमध्ये येण्याचे प्रमाण हे नगण्य आहे. आजवर अशी एकही केस भारतात आढळलेली नाही. जगात काही ठिकाणी याबाबत काही केसेस आढळून आल्याने आरोग्य विभागाने शासनाच्या निर्देशाप्रमाणे योग्य ती खबरदारी व उपाययोजना याचे नियोजन केले असल्याचे प्रतिपादन आरोग्य विभागाच्या उपसंचालिका डॉ.कांचन वानेरे यांनी केले. अंडी व चिकन खावे किंवा कसे याबाबत वेगवेगळ्या शंका व अफवा पसरविल्या जातात. अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.

प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र नागपूर येथील कोंबड्यातील मरतूक ही बर्ड फ्लू रोगाच्या लागणमुळे झाल्याचे तपासणीअंती स्पष्ट झाल्यामुळे नागपूर येथील आरोग्य उपसंचालक कार्यालयात सर्व संबधित यंत्रणाची बैठक संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. कविता मोरे, सहायक संचालक आरोग्य डॉ. प्रदीप आवटे, डॉ.प्रमोद गवई व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आहारात असलेले चिकन व अंडी व्यवस्थित शिजवलेले असतील, अंडी व्यवस्थित उकडलेली असतील तर ते खाण्यास हरकत नाही, असे डॉ. कांचन वानेरे यांनी स्पष्ट केले. खबरदारीचे उपाय म्हणून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व ठिकाणच्या टीम या सज्ज केल्या आहेत. ज्या ठिकाणी इनफ्ल्यूएंजा सारखा आजार आढळतो अशा रुग्णांना आयसोलेटेड करुन त्यांच्या घशातील सॅम्पल्स तपासणीसाठी घेऊ असे त्या म्हणाल्या.

बाधीत क्षेत्र संपूर्णपणे शास्त्रोक्त पद्धतीने निर्जंतुकीकरण करुन भविष्यात तीन ते चार महिने या प्रक्षेत्रावर पक्षांचे संगोपन होणार नाही. याचबरोबर येथून अंडी किंवा एक दिवसीय कुक्कुट पिल्ले यांचा पुरवठा होणार नसल्याचे प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रातर्फे कळविण्यात आले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos