आमदार कृष्णा गजबे उद्या तर ४ ला आमदार डॉ. देवराव होळी भरणार उमेदवारी अर्ज


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली 
: स्थानिक विधानसभा क्षेञाचे भाजप - शिवसेना , आर पि आय आठवले, रासप   चे अधिकृत उमेदवार आमदार कृष्णा  गजबे हे  उद्या ३ ऑक्टोबर रोजी  सकाळी ११ वाजता तर गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे उमेदवार आमदार डॉ. देवराव होळी हे शुक्रवार ४ ऑक्टोबर रोजी  उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती भाजप कडून देण्यात आली आहे. 
आमदार गजबे यांच्या नामांकन दाखल कारण्याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष किसन  नागदेवे, खा.  अशोक  नेते,  सहकारमहर्षि प्रकाश सावकार  पोरेड्डीवार,मोतीलाल  कुकरेजा, तालुका अध्यक्ष राजु जेठानी , राम लांजेवार,  नंदु पेट्टेवार,  आनंद चौबे, जि. प.  सदस्य तथा सभापती नाना  नाकाडे , रमाकांत ठेंगरी , रोशनीताई पारधी,  पं स सभापती मोहन पा.  गायकवाड,  गोपाल ऊईके,  सर्व  पंचायत समिती सदस्य , देसाईगंजच्या नगराध्यक्ष शालुताई दंडवते , आरमोरीचे नगराध्यक्ष पवन नन्नानरे, रवी गोटेफोडे,   ज्योती नैताम क्षेञातिल सर्व जिप पस सदस्य सर्व नगर सेवक ,नगर सेविका, भाजप सेना चे सर्व  पदाधिकारी, सर्व बुथ प्रमुख , पक्ष कार्यकर्ते  यावेळी उपस्थित राहणार आहेत.  भाजप कडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-02


Related Photos