जि.प. सदस्य अ‍ॅड. लालसु नागोटी अपघातात गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड  :
जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. लालसु नागोटी हे आज १ ऑक्टोबर रोजी  पहाटेच्या सुमारास झालेल्या दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना गडचिरोली येथे उपचारासाठी हलविण्यात आले  आहे.
अ‍ॅड. नागोटी हे हलवेर येथील आपल्या बहिणीकडून भामरागडकडे येत असताना कारमपल्ली वळणाजवळ  पहाटेच्या सुमारास दुचाकीला अपघात झाला. या अपघातात त्यांना गंभीर दुःखापत झाली आहे. यामुळे प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी गडचिरोली येथे हलविण्यात आले आहे.    Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-01


Related Photos