महत्वाच्या बातम्या

 तालुका प्रशासनाच्या वतीने राष्ट्रीय एकता दिन कार्यक्रम संपन्न


विदर्भ न्युज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : ३१ ऑक्टोबर २०२२ सोमवारला सकाळी आठ वाजता तहसील प्रशासन लाखनीच्या वतीने, तहसील कार्यालय लाखनी, पंचायत समिती कार्यालय लाखनी, समर्थ विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय लाखनी, राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय लाखनी, जिल्हा परिषद गांधी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय लाखनी, उमेद बचत गट लाखनी, नगरपंचायत लाखनी, गटसाधन केंद्र लाखनी, सर्व शिक्षा अभियान, पंचायत समिती लाखनी, यांच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय एकता दिन / एकता दौड या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर संपूर्ण माहिती नरेश नवखरे, विषय साधन व्यक्ती, गटसाधन केंद्र लाखनी यांनी सांगितली व राष्ट्रीय एकता दिनाची सर्वांना शपथ दिली, यानंतर विद्यार्थी आणि सर्व उपस्थित असलेले अधिकारी कर्मचारी यांनी सद्भावना दौडेत भाग घेऊन समर्थ तहसील कार्यालय ते पंचायत समिती, सिंधी लाईन ते कुमार पेट्रोल पंप सावरी मुरमाडी वापस तहसील कार्यालय अशी दौड येऊन आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम पार पडला.





  Print






News - Bhandara




Related Photos