महत्वाच्या बातम्या

 बल्लारपुरात आज माता जागरणाचे आयोजन : प्रसिद्ध गायक विक्की दुपारे यांची उपस्थिती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरात नवरात्रोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा होत असून, भजन, कीर्तन, माता जागरणासह दांडिया आणि रासगरब्याची धूम सुरू आहे. देवीच्या आराधनेत भाविक तल्लीन झाले असून, शहरातील विविध भागांत धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज, सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी शिवसैनिक नवदुर्गा मंडळाच्या वतीने माता जागरणाचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवसैनिक नवदुर्गा मंडळाचे प्रमुख संतोष दुर्गे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध गायक विक्की दुपारे यांच्या स्वरांत माता जागरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शिवनगर येथील संतोषी माता मंदिरासमोरील पेपर मिलच्या मोकळ्या मैदानावर सायंकाळी ७ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमाला शिवसेना (शिंदे गट)चे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. युवराज धानोरकर यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि नेते उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. माता जागरणाच्या माध्यमातून भाविकांना भक्तिरसाचा अनुभव घेता येणार असून, या धार्मिक सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि माता राणीच्या दर्शनासह महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे प्रमुख संतोष दुर्गे यांनी केले आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने बल्लारपूर शहरात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, माता जागरणाच्या आयोजनामुळे या उत्सवात आणखी रंगत येणार आहे.





  Print






Related Photos