महत्वाच्या बातम्या

 ८७ केंद्रावर १६ हजार २६१ विदयार्थी देणार दहावीची परिक्षा


- परीक्षा केंद्राच्या ठिकाणी कलम १४४ लागू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : जिल्ह्यात  उदयापासून (१ मार्च)माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेला (इ.१० वी)  सुरवात होत आहे. परिक्षा १ ते २६ मार्च २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. सध्या बारावी म्हणजे उच्च माध्यमिक व  दहावी (माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा) केंद्राच्या ठिकाणी सकाळी ६ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत १०० मीटर परीसरात प्रतिबंध करण्यात आला आहे. या कालावधीत परीक्षा केंद्राच्या ठिकाणी १०० मीटर परीसरातंर्गत २ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित जमा होणार नाही.

दहावीसाठी ८७ केंद्रावर १६ हजार २६१ विदयार्थी परिक्षा देणार आहेत.यादरम्यान कॉपीमुक्त अभियानासाठी भरारी पथकांची नियुक्ती केली आहे.तरी पालक व विदयार्थ्यानीही कॉपीमुक्त अभियानाला सहकार्य करण्याचे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी रविंद्र सलामे यांनी केले आहे.

परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरातंर्गत/ क्षेत्रातंर्गत सकाळी ६ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत नियमित व रोजचे वाहतुकी व्यतिरिक्त इतर हालचालींना प्रतिबंध राहील. परीक्षा केंद्राच्या १०० मीटर क्षेत्रांतर्गत परीक्षेदरम्यान झेरॉक्स, फॅक्स, एस.टी.डी.बुथ, पेजर, मोबाईल फोन,ई-मेल, इंटरनेट सवलती किंवा इतर कोणतीही कम्युनिकेशन सवलतींना प्रतिबंध राहील.





  Print






News - Bhandara




Related Photos