महत्वाच्या बातम्या

 उद्योजकता विकास प्रशिक्षणासाठी २३ फेब्रुवारीला होणार मुलाखत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, गडचिरोली द्वारा आयोजित संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादीत (लिडकॉम), महाराष्ट्र शासन, पुरस्कृत अनुसूचित जाती चर्मकार (चांभार, ढोर, होलार, मोची) प्रवर्गाकरीता गडचिरोली येथे उद्योजकता विकास प्रशिक्षण २७ फेब्रुवारी २०२४ ते २८ मार्च २०२४ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येत आहे. त्याकरिता एक दिवसीय उद्योजकता परिचय कार्यक्रम शुक्रवार २३ फेब्रुवारी २०२४ रोजी वेळ सकाळी ११.०० वाजता सामाजिक न्याय भवन, आयटीआय चौक, गडचिरोली येथे आयोजन करण्यात आलेले आहे.

तरी ईच्छुक उमेदवारांनी अधिक माहिती व मुलाखतीकरिता २३ फेब्रुवारी २०२४ ला सामाजिक न्याय भवन, आयटीआय चौक, गडचिरोली येथे हजर राहावे. अधिक माहीतीकरीता संदीप जाने, प्रकल्प अधिकारी, एमसीईडी, मो. ९६३७५३६०४१ व स्मिता पेरके, कार्यक्रम समन्वयक,मो. ९१७५२२९४१३, यांना संपर्क करावा, असे आवाहन आयोजकांनी केलेले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos