महत्वाच्या बातम्या

 बाथरूममध्ये लपवून ठेवलेला गांजाचा साठा जप्त : चंद्रपूर शहर पोलिसांची कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत चंद्रपूर शहर पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या कारवाईत बिनबा वॉर्ड परिसरातील एका घरातून गांजाचा साठा जप्त करण्यात आला असून एका युवकाला ताब्यात घेण्यात आले आहे. रितीक रंजीत डोंगरे (वय २२) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, मांतग मोहल्ला येथील रितीक रंजीत डोंगरे (२२) हा आपल्या राहत्या घराजवळील बाथरूममध्ये गांजा साठवून त्याची विक्री करीत होता. या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी घराची झडती घेतली.

झडतीदरम्यान बाथरूममध्ये ठेवलेल्या प्लास्टिक पिशवीत गांजासदृश वाळलेली पाने, फुले, देठ व बिया आढळून आल्या.जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाचे वजन सुमारे १ किलो २५.५ ग्रॅम असून त्याची अंदाजित किंमत १५ हजार रुपये आहे. पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल जप्त करून आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६३५/२०२६ नोंद करण्यात आला असून कलम ८(क) व २०(ब)(२) अंतर्गत पुढील तपास सुरू आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सोनवणे, उपनिरीक्षक दत्तात्रय कोलते, विलास निकोडे तसेच डी. बी. पथकाचे मपोहवा. भावना रामटेके, पोहवा. सचिन बोरकर, संजय धोटे, इम्रान शेख, निकेश ढेंगे, जावेद सिद्दीकी, कपुरचंद खरवार, पो. अं. रूपेश पराते, विक्रम मेश्राम, योगेश पिदुरकर, निलेश ढोक, प्रफुल भैसारे, सुशांत घिवे, दिपीका झिंगरे यांनी केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos