महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली : निवृत्त नर्सेसच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा : माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटना, जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने निवृत्त आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यिका व आरोग्य पर्यवेक्षिकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सुहास गाडे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांना निवेदन देण्यात आले. माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी डॉ. उसेंडी यांनी निवृत्त नर्सेस व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रकरणांमुळे त्यांना आर्थिक व प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आणून दिले. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बऱ्याच देयकांचे वितरण, पेन्शनसंबंधी प्रकरणे तसेच इतर प्रशासकीय बाबी तातडीने निकाली काढाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

निवेदनात अनेक वेळा पाठपुरावा करूनही काही प्रकरणे अद्याप निकाली न निघाल्याने संबंधित कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित कार्यवाही करावी, अशा सूचना डॉ. उसेंडी यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून संबंधित प्रकरणांची तपासणी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटनेचे पदाधिकारी व निवृत्त कर्मचारी उपस्थित होते.

सेवेत असताना आरोग्य क्षेत्रात मोलाची सेवा बजावणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यांच्या हक्काच्या लाभांसाठी संघटना सातत्याने पाठपुरावा करीत राहील, असे मत माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी व्यक्त केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos