महत्वाच्या बातम्या

 युवा संकल्पनेतून एकोडी येथे बांधला वनराई बंधारा 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : तालुक्यातील एकोडी येथील पाणी वाहत असलेल्या नाल्यावर युवा संकल्प संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सदस्यांनी स्वतः युवा संकल्पनेतून वनराई बंधारा साकारला आहे. वनराई बंधाऱ्यामुळे साचलेल्या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांच्या गाई बैलांना व शेळ्यांना व इतर प्राण्यांना पाणी पिण्यासाठी होत आहे. तसेच जलसंधारणामुळे  शेतीतीलविहिरींना पाण्याची पातळी खोलास न जाण्यास सहकार्य होईल. व इतर जवळी शेतकऱ्यांना याचा लाभ होईल. मुक्या जनावरांना याचा अतिशय लाभ होईल. तसेच या बांधामुळे भविष्यातही पाणी साठवून राहण्याचे भूगर्भातील पाण्याची पातळी ही. वाढणार आहे. वनराई बंधाऱ्याच्या माध्यमातून पाणी अडवणे त्याचा फायदा करून घेणे. अशी ही संकल्पना आहे. 

यावेळी युवा संकल्पचे सचिव चेतन कोकावार, बादल धोटे, पंकज मडावी, अविनाश शेडमाके, ओम प्रकाश चौधरी, करण तुमदे, सुधीर मिस्त्री, अविनाश मडावी, प्रशांत कुसराम, यांनी सहकार्य केले. युवा संकल्प संस्थेचे अध्यक्ष राहुल वैरागडे आणि आभार मानले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos