महत्वाच्या बातम्या

 कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत जमीन विक्रीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना शेतजमीन उपलब्ध करून देण्यात येते. इच्छुक शेतकऱ्यांनी याबाबत समाज कल्याण कार्यालयास प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त आशा कवाडे यांनी केले आहे. 

अर्जदाराने (जमीन विक्री करणारा/जमीन मालक) विहित नमुन्यात अर्ज सादर करावा. जिरायती जमिनीकरिता ही रक्कम प्रति एकर ५ लाख रुपये आणि बागायत जमिनीकरिता प्रति एकर ८ लाख रुपये इतकी कमाल मर्यादेत राहील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी व सविस्तर माहितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त यांनी केले आहे. 





  Print






Related Photos