गोंडीयन सामाजिक सहाय्यता कल्याण संस्था चंद्रपूर तर्फे भामरागड येथील पुरपिडीतांना मदत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड : 
गोंडीयन सामाजिक सहाय्यता कल्याण संस्था चंद्रपूरच्या वतीने भामरागड येथील पुरपिडीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तु, कपडे, तांदूळ, गव्हाचे पीठ, डाळ, खाद्यतेल, व स्वयंपाकाला लागणाऱ्या इतर आवश्यक वस्तु  वाटप करण्यात आल्या. 
मागील महिन्यापासून तर आजपर्यंत भामरागडला सातवेळा पुराने विळखा घातला होता. यांत अनेक कुटुंब उघड्यावर पडले. भामरागड व नदीकिनारी असणाऱ्या गावांची अतोनात हानी झाली. घरापासून तर जीवनावश्यक वस्तूपर्यंत या पुरात वाहून गेले. पुरपिडीत बांधवांची ही दयनिय व्यथा माहित होताच लगेच गोंडीयन सामाजिक सहाय्यता कल्याण संस्था चंद्रपूर येथील टिमने तात्काळ मदत पोहचविली. चंद्रपूर येथील गोंडीयन बांधवांने जे  औदार्य दाखविले ते  कौतुकास्पद आहे. त्यांनी जीवनावश्यक वस्तूंसोबत कपडे प्रत्यक्षरित्या वाटप करून पुरपिडीत बांधवांना मदतीचा हात देण्यास आवाहन केले. 
यावेळी गोंडवानाचे व गोंडीयन चळवळीचे शिलेदार बिच्चू वड्डे, शिवाजी कुंजामी, सुकदेव वाचामी, मुकेश मडावी,  सगनी कुंजामी, चंदा वड्डे यांच्या  सहकार्याने प्रत्यक्ष मदत गरजू लोकांपर्यंत पोहोचविता आली. 
याप्रसंगी, गोंडीयन सामाजिक सहाय्यता कल्याण संस्था चंद्रपूरचे सचिव सुधाकर कन्नाके तसेच विजयराव तोडासे, ज्योतीराव गावडे, रमेश कुंभरे, गुणाकार जुमनाके, सुरेश टेकाम, बापुजी मडावी यांनी सहकार्य केले.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-16


Related Photos