तालुका अधिवक्ता संघ अहेरीच्या वतीने पूरग्रस्तांना भांडी व जीवनावश्यक वस्तुंचे वितरण


-   जिल्हा परिषद सदस्य ॲड. लालसू नोगोटी यांच्या प्रमुख उपस्थित जीवनावश्यक वस्तुंचे वाटप
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड : 
 तालुका अधिवक्ता संघ अहेरीच्या वतीने भांडी व जीवनावश्यक वस्तुंचे भामरागड तालुक्यातील गुंडूरवाही येथील पूरग्रस्तांना वितरण करण्यात आले. 
 अहेरी तालुका अधिवक्ता संघाचे सदस्य ॲड. राजेंद्रप्रसाद मेंगनवार, ॲड.सतीश जैनवार, ॲड. संघरत्न कुंभारे यांनी क्षेत्राचे जिल्ह्य परिषद सदस्य ॲड. लालसू नोगोटी यांच्या उपस्थितीत भांडी व जीवनावश्यक वस्तुंचे वितरण केले. भामरागड ते गुंडूरवाही रस्ता पावसामुळे खराब झालेला आहे. म्हणुन अहेरी तालुका अधिवक्ता संघाचे सदस्य ट्रैक्टरने प्रवास करत  गुंडूरवाही येथे पोहचले.  त्यानी गावातील पूरग्रस्त व गरजूना भांडी व जीवनावश्यक वस्तुंचे वितरण केले. या प्रसंगी या क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य तथा अहेरी तालुका अधिवक्ता संघाचे सदस्य ॲड. लालसू नोगोटी हे प्रामुख्याने उपस्थित होते. जीवनावश्यक वस्तुंचे वितरण झालयवर अधिवक्तानी गावकऱ्यांशी गावातील अन्य समस्यावर सविस्तर चर्चा केली. याप्रसंगी अहेरी तालुका अधिवक्ता संघाचे सचिव ॲड.राजेंद्रप्रसाद मेंगंनवार म्हणाले की, आदिवासींचे जीवन हे संघर्षमय आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक समस्याना तोंड देत आपले जीवन जगत आला आहे. अनेक लोक तुमच्या पाठीशी आहेत. म्हणुन खचून जाऊ नये. गावकऱ्यांच्या वतीने ॲड. लालसू नोगोटी यांनी अधिवक्ता संघाचे आभार मानले.



  Print






News - Gadchiroli | Posted : 2019-09-14






Related Photos