भाजपा छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच सर्वधर्म समभावाने काम करत आहे : उदयन राजे भोसले


- अमित शहांच्या उपस्थितीत भाजपात केला प्रवेश 
वृत्तसंस्था / नवीदिल्ली : 
मोदींच्या विचाराशी सहमत असल्याने भाजपामध्ये प्रवेश केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच भाजपा सर्वधर्म समभावाने काम करत आहे. शिवाजी महाराजांचे  विचार घेऊन भाजपा पुढे जात आहे, त्यामुळे विविध राज्यातून भाजपामध्ये प्रवेश केला जात आहे. प्रत्येक राज्यात होणाऱ्या भाजपाच्या प्रगतीचे कारण म्हणजे मोदी आणि शाह यांचे काम असल्याचे भाजपात प्रवेश केलेले  साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले  म्हणाले. 
भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत  खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपामद्ये जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे आणि रामदास आठवले यांची उपस्थिती होती.  
यावेळी बोलताना उदयनराजे भोसले यांनी भाजपाने काश्मीरचा प्रलंबित असलेला प्रश्न सोडवल्याने प्रभावित झाल्याचे म्हटले. मी लहानपणापासून ऐकत आलेल्या काश्मीर प्रश्नावर मोंदी आणि शाह यांनी योग्य निर्णय घेतला आहे. भारत एकसंघ कसा राहिल यावर भाजपा काम करत आहे.
लोकसभा निवडणूक होऊन तीन महिनेच उलटले आहेत. लोकांच्या हितासाठी राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला आहे. इतिहासात असे पहिल्यांदाच झाले असेल निवडणुकीच्या तीन महिन्यानंतर एखाद्या नेत्याने पक्षप्रवेश केला असेल. निवडणुकीला तीन महिने बाकी असताना अनेकांनी प्रवेश केला आहे. मात्र, मी तीन महिने बाकी असताना पक्षप्रवेश केला आहे.
“छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज भाजपासोबत आले आहेत. भाजपाच्या कोट्यवधी कार्यकर्त्यांकडून त्यांचं स्वागत करतो. त्यांनी आज तीन महिन्यातच खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला. भाजपा पूर्वीपासून छत्रपतींच्या विचारातून प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत. लोकसभेपेक्षाही विधानसभेत आणखी मोठा विजय मिळेल,” असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.   Print


News - World | Posted : 2019-09-14


Related Photos