महापूरातून सावरत भामरागडवासीयांनी जल्लोषात दिला बाप्पांना निरोप


- ३२ वर्षांपासूनची परंपरा भामरागडवासीयांनी जपली
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
तालुक्यात आलेल्या महापूरामुळे जनजीवन विस्कळीत झाले. मात्र अशाही परिस्थितीत भामरागड वासीयांनी ३२ वर्षांची परंपरा जोपासत गणेशोत्सव साजरा केला. आज ११ व्या दिवशी भामरागड वासीयांनी पुरातून सावरत जल्लोषात गणपती बाप्पाला निरोप दिला.
भामरागड येथे वीर बाबुराव शेडमाके चौकात सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने मागील ३२ वर्षांपासून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यावर्षी महापूर असतानाही मंडळाच्या वतीने गणेशाची स्थापना करण्यात आली. आज दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उत्साहात विसर्जन करण्यात आले. पारंपारीक आदिवासी नृत्यावर मिरवणूकीमध्ये युवक - युवती व नागरीकांनी ठेका धरला. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-13


Related Photos