महत्वाच्या बातम्या

 मधकेंद्र योजनेच्या जनजागृतीकरीता कारंजा येथे शिबिर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधकेंद्र योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या जनजागृतीसाठी ७ फेब्रुवारी रोजी एक दिवसीय जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात सहभाग नोंदविण्यासाठी इच्छुकांनी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मध केंद्र योजनेंतर्गत महिला, युवक - युवती, सुशिक्षित बेरोजगार, आदिवासी, जेष्ठ नागरिक, अनुसूचित  जाती-जमाती, इतर मागासवर्ग, भटक्या विमुक्त जमाती, स्वातंत्र सैनिक, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, स्वयंसहाय्यता युवा गट, शेतमजूर, शेतकरी, भुमिहिन, पारंपारिक कारगीर इत्यादी समाजातील सर्वच घटकांना मध योजनेचा लाभ देण्यात येतो.

याशिवाय मंडळामार्फत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना इत्यादी योजना राबविण्यात येतात. या योजनेंतर्गत उद्योजकांना विविध उद्योग उभारण्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येते. तसेच अनुदानाचा लाभ देण्यात येतो. इच्छुक व्यक्तींना विनामुल्य निवासी प्रशिक्षण देण्याची व्यवस्था मंडळामार्फत करण्यात येते.

या योजनांचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांना व्हावा, यासाठी योजनेच्या जनजागृतीसाठी कारंजा तालुक्यातील उमरी येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

सदर शिबिर विनामुल्य असून लाभार्थ्यांनी शिबिराचा लाभ घ्यावा. शिबिरामध्ये कृषि विभाग, वन विभाग, पंचायत समिती व शासकीय कार्यालयाचा सुध्दा सहभाग असणार आहे, असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos