विज्ञानात केलेले सर्व प्रयोग आपल्या अमर्याद धाडसाची आठवण देतात : पंतप्रधान नरेंद्र मोदी


वृत्तसंस्था / बंगळुरू :   भारत जगातील महत्त्वाच्या अवकाश शक्तींपैकी एक आहे. विज्ञानात केलेले सर्व प्रयोग आपल्या अमर्याद धाडसाची आठवण देतात. चांद्रयान-२ च्या अंतिम चरणाचा निकाल आमल्या अपेक्षेनुसार आला नाही, मात्र चांद्रयानाचा संपूर्ण प्रवास अतिशय उत्तम होता असे पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी म्हणाले. इस्त्रोच्या सेंटरमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केलं.
चांद्रयान अवघे २.१ कि.मी.वर असताना विक्रम लँडरशी असलेला संपर्क तुटला आणि शास्त्रज्ञांबरोबरच संपूर्ण देशाचा श्वास रोखला गेला. यावेळी उपस्थित असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांना धीर दिला.
जीवनात चढ-उतार येत असतात. संपूर्ण देश तुमच्या पाठीशी उभा आहे. तुम्ही विज्ञानाची आणि पर्यायाने देशाची सेवा केली आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे. गेल्या तीन वर्षांपासून या मोहिमेसाठी खडतर मेहनत घेतली आहे. आतापर्यंत तुम्ही यशस्वी कामगिरी केली आहे. धीर सोडू नका. संपर्क तुटला म्हणून खचून जाऊ नका. तुम्ही केलेले काम छोटे नाही. इस्त्रो प्रमुखांनी पुन्हा संपर्क होऊ शकतो, असे सांगितले आहे. तुमच्या मेहनतीनेच पुन्हा एकदा देशाची मान उंचावेल. पुढील कामगिरीसाठी तुम्हाला शुभेच्छा, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला. 
यावेळी मोदी म्हणाले की, ज्ञानाचा सर्वात मोठा शिक्षक जर कुणी असेल तर तो आहे विज्ञान. विज्ञानात अपयश नसतेच, असतो तो केवळ प्रयोग आणि प्रयत्न असतो. कधीही हार न मानणाऱ्या आपल्या संस्कृतीचे इस्रोनं जतन केलं आहे. मी कालही म्हटले होते, आणि आजही म्हणतो की, मी तुमच्या सोबत आहे. देश देखील आपल्या सोबत आहे. तुम्हा सर्वांना पुढील सर्व मोहिमांसाठी खूप खूप शुभेच्छा.
तुम्ही दह्यावर रेषा खेचणारे लोक नसून दगडावर रेषा काढणारे लोक आहात असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांचा गौरव केला आहे. मी आणि संपूर्ण देश इस्त्रो आणि शास्त्रज्ञांच्या बाजूने आहे. निराश होऊ नका. भारतीय शास्त्रज्ञांनी देशासाठी अमूल्य योगदान दिले आहे. चांद्रयान २ साठी आपल्या टीमने प्रचंड परिश्रम घेतले आहेत. या मोहिमेशी संबंधित सर्वजण धेय्याने झपाटलेले होते.आता चंद्रावर जाण्याचे आपले स्पप्न अधिक प्रबळ झाल्याचे मोदी म्हणाले.   Print


News - World | Posted : 2019-09-07


Related Photos