महत्वाच्या बातम्या

 वर्धा जिल्ह्यात वाळू विक्रीसाठी डेपो सुरू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : सुधारित वाळू धोरणानुसार २०२३-२४ या व्दितीय वर्षासाठी वाळू डेपो सुरू करण्यात आले आहे. हिंगणघाट तालुक्यातील डेपो क्र. ५ मौजा सावंगी (रिठ) येथे १०० ब्रास साठा, डेपो क्र. ६ मौजा येळी येथे १ हजार २८९.६६ ब्रास व वर्धा तालुक्यातील डेपो क्र. ७ मौजा आलोडी येथे ७० ब्रास वाळू साठा उपलब्ध आहे.

वाळू खरेदीसाठी जिल्ह्यातील नागरिकांना महाऑनलाईन (सीएससी व सेतू) केंद्रातून नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. महाखनिज या संकेतस्थळावर वाळूची नोंदणी करता येईल. नागरिकांनी १३३ रुपये प्रती मेट्रीक टन आणि त्यावर १० टक्के जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी या दराने वाळू खरेदी करता येईल, असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos