महत्वाच्या बातम्या

 जिल्हास्तरीय माजी सैनिक मेळावा संपन्न


- पेंशन विषयक माजी सैनिक व अवलंबीतांना मार्गदर्शन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : जिल्हयातील माजी सैनिक विधवा, विर नारी, विर माता व त्यांचे अवलंबीत यांचा माजी सैनिक मेळावा काल ३१ जानेवारी रोजी जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेजर पवन कुमार, अभिलेख कार्यालय ब्रिगेड ऑफ गॉर्डस कामठी हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा नियोजन अधिकारी शशिकुमार बोरकर शैलजा वाघ-दांदळे, जिल्हा माहिती अधिकारी ॲडव्हकेट दिवान निर्वाण,  रामचंद्र कारेमोरे उपस्थित होते.

या मेळाव्यात २०० हून अधिक भंडारा व गोंदिया जिल्हयातील माजी सैनिक/विधवा व अवलंबीत व शासकीय कर्मचारी बहुसंख्येने कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात दिप प्रज्वलनाने झाली. दोन मिनीटे मौन पाळन शहिद जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्तावीक सुधाकर लुटे, वरिष्ठ लिपिक, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांनी केले.

ॲङ दिवान निर्वाण यांनी पेंशन बाबत कायदेविषयक माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मेजर पवन कुमार यांनी पेंशन विषयक माजी सैनिक/विधवा व अपंग अवलंबीतांना मार्गदर्शन केले तसेच अभिलेख कार्यालयाकडून मिळणाऱ्या लाभाविषयी सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुधाकर लुटे, वरिष्ठ लिपिक, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांनी केले तसेच कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी  कर्मचारी सुरेश घनमारे (कल्याण संघटक), विनोद लांजेवार, आंभोरे यांनी परिश्रम केले.





  Print






News - Bhandara




Related Photos