महत्वाच्या बातम्या

 प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा शुभारंभ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे.  योजनेची जिल्हयात अंमलबजावणी करण्यात येत आहे. योजनेअंतर्गत जिल्हयातील प्रशिक्षण कार्यक्रमाचे ऑनलाईन स्वरूपात उदघाटन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते आज ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. त्यामध्ये भंडारा जिल्हयातील त्रिनेत्र पदूम कृषी बहूउददेशीय संस्थेंचे लाखांदूर व गणेशपूर तसेच, विओसी संस्थेंच्या वरठी या तीन प्रशिक्षण केंद्रांचा समावेश आहे.

जिल्हयातील लाखांदूर या प्रशिक्षण केंद्रात टेलर (दर्जी) ट्रेडमध्ये २५ उमेदवारांना, गणेशपूर या प्रशिक्षण केंद्रात मेसन (मिस्त्री)  ट्रेडमध्ये १५ उमेदवारांना आणि वरठी या प्रशिक्षण केंद्रात कारपेंटर (सुतार) या ट्रेडमध्ये ४९ उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण केंद्रांतील नोंदणीकृत लाभार्थ्यांना ५ दिवसांचे संबंधित ट्रेडमध्ये मुलभूत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणादरम्यान टुलकिट व प्रतिदिन ५०० रूपये मानधन तसेच, प्रशिक्षणानंतर कर्ज सहाय्य देण्यात येणार आहे.

सदर प्रशिक्षण केंद्राच्या उदघाटन कार्यक्रमाकरीता गणेशपूर या प्रशिक्षण केंद्रात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडाराचे सहायक आयुक्त सुधाकर झळके, खादी ग्रामोद्योग अधिकारी, सी. बी. देवीपुत्र, जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती शैलजा वाघ, मुख्यमंत्री फेलो निलेश साळुंखे, त्रिनेत्र संस्थेचे प्रमुख महेश्वर शिरभाते, हे मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाकरीता जिल्हयातील विश्वकर्मा संबंधीत उमेदवार गणेशपूर - ६०, दिघोरी - ३५,  वरठी - ६५ उपस्थित होते.

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या उदघाटन कार्यक्रमाकरीता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांचे सहायक आयुक्त सुधाकर झळके यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयातील भाऊराव निंबार्ते ,कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, सोनु उके जिल्हा कौशल्य विकास समन्वयक, श.क.सय्यद वरिष्ठ लिपीक, आशालता वालदे  वरिष्ठ लिपीक, प्रिया माकोडे वरिष्ठ लिपीक, सुहास बोंदरे जिल्हा समन्वयक, आय.जी.माटूरकर  आदींनी अथक परीश्रम घेतले.





  Print






News - Bhandara




Related Photos