दिलासाग्राम कॉन्व्हेंट मध्ये परीक्षा पे चर्चा : २०२४ कार्यक्रम
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परीक्षा पे चर्चा- २०२४ हा अतिशय महत्वाचा कार्यक्रम बल्लारपूर शहरातील दिलासाग्राम कॉन्व्हेंट स्कूल, बल्लारपूर येथे यशस्वीरित्या पार पडला आणि त्यात विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला.
जीवनातील विविध परीक्षांना कसे सामोरे जायचे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातून विद्यार्थ्यांना शिकायला मिळाले.
यावेळी दिलासाग्राम कॉन्व्हेंट स्कूलच्या प्राचार्या सिस्टर विनया थेलकट्टा, शिक्षक डेविड रेबेलो, सतीश कनकम, शिक्षिका निशा रेबेलो, संगीता सरोज, राहुल बोरीकर प्रमुखपणे उपस्थित होते.
News - Chandrapur