नारगुंडा पोलिसांच्या मानवतावादी दृष्टिकोनामुळे वाचले गर्भवती महिलेचे प्राण!


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
   जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे दळणवळ, संदेशवहनाच्या सर्व सेवा कोलमडून पडलेल्या होत्या. त्याचा त्रास नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे.  काल २६ ऑगस्ट   रोजी तालुक्यातील नारगुंडा गावातील गर्भवती महिला सविता सैनू गोटा यांना प्रचंड वेदना सहन कराव्या लागल्या. मात्र नारगुंडा पोलीस वेळीच मदतीला आल्याने तिचे प्राण वाचले आहे. 
 गर्भवती महिलेला अचानक प्रसूती वेदना होऊ लागल्या ; परंतु मुसळधार पावसात मोबाईल नेटवर्क नसल्यामूळे १०८ क्रमांक वर संपर्क करून महिलेला दवाखान्यात हलवणे शक्य होते नव्हते. सदर बाब  नारगुंडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक किरण वाघ यांना  समजताच त्यांनी पोलीस विभागाच्या संदेश प्रणालीच्या सहायाने भामरागड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सूरज सुसतकर यांचेशी संपर्क करून सदर महिलेची प्रकृती नाजूक  असल्याने आपण तात्काळ रुग्णवाहिका पाठवावी असे संगीतले .  पोलीस उपनिरीक्षक सुसतकर यांनी सदर बाब  भामरागड येथील  पत्रकार मित्रांच्या  निदर्शनास आणून दिली असता त्यांनी तात्काळ रुग्णवाहिकेची चालक डी.एच.हलदार यांचेशी संपर्क करून नारगुंडा येथे रुग्णवाहिका पाठवली व गर्भवती महिलेला पुढील उपचारासाठी  भामरागड येथील रुग्णालयात दाखल केले. सदर महिलेचे प्राण वाचले. सदर महिलेच्या कुटुंबीयांनी नारगुंड्याचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक किरण वाघ यांचे आभार मानून पोलिसांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी नारगुंडा पोलिस  मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक तुकाराम खडके व कर्मचारी यांनी मदत केली.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-27


Related Photos