महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


१९ जानेवारी महत्वाच्या घटना

१८३९ : ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने एडनचा ताबा घेतला.

१९०३ : अमेरिकेचे अध्यक्ष थिओडोर रुझव्हेल्ट यांनी इंग्लंडचे राजे एडवर्ड (सातवे) यांना बिनतारी संदेश पाठवला. अटलांटिक महासागरापार पाठवलेला हा पहिला बिनतारी संदेश होता.

१९४२ : दुसरे महायुद्ध – जपानी सैन्याने ब्रह्मदेशवर आक्रमण केले.

१९४९ : पुणे नगरपालिका व उपनगरपालिका विसर्जित होऊन पुणे महानगरपालिका स्थापन झाली.

१९४९ : क्यूबाने इस्त्रायला मान्यता दिली.

१९५४ : कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाचे भूमिपूजन.

१९५६ : देशातील सर्व विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा राष्ट्रपतींचा वटहुकूम जाहीर.

१९६६ : भारताच्या पंतप्रधानपदी इंदिरा गांधी यांनी पदभार स्वीकारला.

१९६८ : पहिली यशस्वी ह्रुदयरोपण शस्त्रक्रिया डॉ. ख्रिस्तोफर बर्नाड यांनी केली.

१९८६ : (c)brain नावाचा कॉम्प्युटरचा पहिला व्हायरस पसरण्यास सुरूवात झाली.

१९९६ : ज्येष्ठ तबलावादक उस्ताद अल्लारखा खाँ यांना मध्य प्रदेशाचा कालिदास सन्मान जाहीर.

१९९६ : प्रसिध्द मल्याळी लेखक एम. टी. वासुदेवन नायर यांची १९९५ च्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड.

२००६ : नासाचे न्यू होरायझन्स हे अंतराळयान प्लुटोकडे प्रक्षेपित झाले.

२००७ : सरदार सरोवर धरणाचा वीजनिर्मिती प्रकल्प देशाला अर्पण करण्यात आला.

१९ जानेवारी जन्म

१७३६ : वाफेच्या इंजिनाचा शोध लावणारे स्कॉटिश शास्रज्ञ आणि संशोधक जेम्स वॅट यांचा जन्म.

१८०९ : अमेरिकन गूढ व भयकथांचे लेखक व कवी एडगर अ‍ॅलन पो यांचा जन्म. (मृत्यू: ७ ऑक्टोबर १८४९)

१८८६ : हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक रामचंद्र गणेश कुंदगोळकर तथा सवाई गंधर्व यांचा जन्म. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९५२)

१८९२ : विनोदी लेखक चिंतामण विनायक जोशी यांचा जन्म.

१८९८ : मराठी लेखक, कादंबरीकार, लघुनिबंधकार व समीक्षक विष्णू सखाराम तथा वि. स. खांडेकर यांचा जन्म. (मृत्यू: २ सप्टेंबर १९७६)

१९०६ : चित्रपट दिगदर्शक, अभिनेते आणि निर्माते विनायक दामोदर कर्नाटकी उर्फ मास्टर विनायक यांचा जन्म.

१९२० : संयुक्त राष्ट्रांचे पाचवे सरचिटणीस झेवियर पेरेझ द कुइयार यांचा जन्म.

१९३६ : बांगलादेशचे ७ वे राष्ट्राध्यक्ष झिया उर रहमान यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे १९८१)





  Print






News - todayspecialdays




Related Photos