महत्वाच्या बातम्या

 कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिनानिमीत्य विविध स्पर्धेचे आयोजन करावे : खा. रामदास तडस


- जिल्हा क्रिडा संकुल वर्धा येथे क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय वर्धा द्वारे विविध स्पर्धाचे आयोजन.

विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / वर्धा : सर्वांचे प्रेरणास्थान, ऑलिंपिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारे स्वतंत्र भारतातील पहिले खेळाडू महान कुस्तीपटू पै स्व खाशाबा जाधव यांचा जन्मदिन हा दरवर्षी राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला, आज राज्य क्रीडा दिनानिमीत्य आयोजीत स्पर्धेमध्ये सर्व खेळाडुंनी सहभाग घेऊन खऱ्या अर्थाने त्यांना श्रध्दाजंली दिली आहे. याच प्रमाणे दरवर्षी राज्य क्रीडा दिनानिमीत्य विविध खेळांचा समावेश करुन स्पर्धेचे आयोजीत करुन वर्धा जिल्हयातील खेळाडुंना एक व्यासपीठ उपलब्ध करुन द्यावे, असे यावेळी खासदार रामदास तडस म्हणाले.

महान कुस्तीपटू स्व. खाशाबा जाधव यांची जयंती व राज्य क्रीडा दिनाचे औचित्य साधून जिल्हा क्रिडा संकुल वर्धा येथे क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय वर्धा व्दारा विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले, स्पर्धेच बक्षिस वितरण सोहळा खासदार रामदास तडस यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. यामध्ये विजयी व उपविजयी खेळाडू व संघांना स्मृतिचिन्ह मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

सदर कार्यक्रमाकरिता शिवछत्रपती पुरस्कारार्थी किशोर पोफळी प्राध्यापक डॉ. प्रकाश चोपडे कुस्ती खेळाचे जेष्ठ खेळाडू मदनसिंग चावरे, गिरीष उपाध्याय, क्रीडा अधिकारी अनिल निमगडे प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम ह्या न्यायालयीन कामकाजाकरिता नागपूर येथे गेल्याने त्यांनी सदर कार्यक्रमाकरिता शुभेच्छा व मार्गदर्शन केले.

खाशाबा जाधव राज्य क्रीडा दिवस स्पर्धा मध्ये कुस्ती, व्हॉलीबॉल, हॅन्डबॉल या खेळांचे आयोजन करण्यात आलेले होते, यामध्ये कुस्तीमध्ये मुले 51 कि वजन गटात प्रथम पुरस्कार शिवम जाधव, व्दितीय पुरस्कार पियुश शेटे, 61 कि वजन गटात प्रथम पुरस्कार वेदांत चव्हाण, व्दितीय पुरस्कार भुषन आगलावे, 65 कि वजन गटात प्रथम पुरस्कार शंकेश पाटील, व्दितीय पुरस्कार समीर वाढई, 82 कि वजन गटात प्रथम पुरस्कार अंश श्रीवास, व्दितीय पुरस्कार प्रज्वल वाटकर, 86 कि वजन गटात प्रथम पुरस्कार नवनाथ भुसनार, व्दितीय पुरस्कार अजय बिलारे, 92 कि वजन गटात प्रथम पुरस्कार सम्राट कांबळे व्दितीय पुरस्कार आशिष लोहांडे, 92 ते 120 कि वजन गटात प्रथम पुरस्कार श्रृषीकेश बोधाने व्दितीय पुरस्कार प्रज्वल बावने, मुलीमध्ये खुला गट प्रथम पुरस्कार गायत्री वडतकर, व्दितीय पुरस्कार शालीनी मोरे, 53 किलो वजन गटात प्रथम पुरस्कार कोमल सलामे, व्दितीय पुरस्कार अनुष्का सोमलवार यांनी पुरस्कार प्राप्त झाला.

व्हालीबॉल स्पर्धेमध्ये मुली प्रथम पुरस्कार डिसीसी वर्धा, व्दितीय पुरस्कार युवा एकता क्रीडा मंडळ वर्धा, मुलामध्ये प्रथम पुरस्कार डिसीसी वर्धा व्दितीय पुरस्कार साई स्पोर्टस वर्धा, हॅन्डबॉल स्पर्धेमध्ये मुली प्रथम पुरस्कार अग्रगामी स्कुल म्हसाळा व्दितीय पुरस्कार वर्धा क्लब वर्धा, मुलामध्ये प्रथम पुरस्कार जेबी बॉईज व्दितीय पुरस्कार वर्धा क्लब वर्धा प्राप्त झाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन घोडे तर आभार प्रदर्शन अनिल निमगडे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता बॅडमिंटनचे नितीन जाधव, मनोज झाडे, प्रतीक बोधे, यश, ओम तिवारी, रामटेके जिल्हा क्रीडा संकुलाचे व्यवस्थापक रवी काकडे, अशोक पेढेकर, जयंत गोडघाटे, नाना टेकाम यांनी परिश्रम घेतले. यावेळी मोठया संख्येने विविध स्पर्धेकरिता आलेले खेळाडु उपस्थित होते.





  Print






News - Wardha




Related Photos