महत्वाच्या बातम्या

 युवामंच सामाजिक संघटना व राजपथ अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रच्या वतीने तालुका स्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षाचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  

तालुका प्रतिनिधी / आरमोरी : यांच्या संयुक्त विद्यमाने 2 ऑक्टोबर 2022 रोजी गांधी जयंती च्या शुभ पर्वावर शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील करिअर च्या वाटा आत्ता शोधण्यास सुरुवात व्हावी. आणि त्यासाठी आवश्यक असल्याने स्पर्धा परीक्षा व अभ्यासक्रम आत्ता कळावा या उद्देशाने भव्य तालुका स्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा 2022 चे आयोजन करण्यात आले होते. ही परीक्षा 1ऑक्टोबर 2022 रोजी डॉ. आंबेडकर विद्यालय पालोरा रोड आरमोरी येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी दोन गटातून ही परीक्षा विद्यार्थ्यांनी दिली. गट अ इयत्ता 5 वी ते 10 वी व ब गट खुला गट यात सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी असे एकूण अ गट 400 व ब गट 200 अशा 600 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 

सदर परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभ गांधी जयंतीच्या पर्वावर आयोजित करण्यात आला.यावेळी अध्यक्ष मा. पवन नारनवरे नगराध्यक्ष उद्घाटक मा. मनोज काळबांडे पोलिस निरीक्षक प्रमुख मार्गदर्शक उईक मॅडम प्रमुख अतिथी मा. पंकज खरवडे , भारत बावनथडे,विलास पारधी , मनोज मने, गुलाब मने, सामाजिक कार्यकर्ते नदु नाकतोडे व राजपथ अकॅडमी च्या संचालिका शिल्पा शशिकांत मडावी उपस्थित होते.

यावेळी गट ब खुला मधून प्रथम क्रमांक सागर भोयर द्वितीय क्रमांक चंदना रॉय तर तृतीय क्रमांक कृष्णा गणेश हलामी व गट अ 5 वी ते 10 वी मधून प्रथम क्रमांक अभिजित साळवे द्वितीय क्रमांक अश्वघोष बांबोळे तर तृतीय क्रमांक स्वयम् खोब्रागडे या 7 व्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यानं पटकाविला .

सामान्य ज्ञान स्पर्धा यशस्वी व्हावी याकरिता युवामंच चे अमोल खेडकर, अमित राठोड,  टींकु बोडे, युगल सामृतवार, संजय सोनटक्के, जितेंद्र ठाकरे व राजपथ अकॅडमी च्या टीम नी अथक परिश्रम घेतले. तालुक्यातील सर्व विद्यालय महाविद्याल यांनी सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे संचालिका शिल्पा शशिकांत मडावी यांनी आभार मानले. यावेळी परीक्षक म्हणून विवेक उईके, राज सर्पे मिलिंद हर्षे लोमेष लठ्ठे, पवन उप्रिकर, थोमेशावर मैंद, महेश नारदेलवर यांनी काम पाहिले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos