महत्वाच्या बातम्या

 विसापूर फाट्यावर चोरट्यांचा हैदोस : केळी चिप्सचे दुकान फोडून माल लंपास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर-चंद्रपूर महामार्गावरील विसापूर फाटा परिसरात चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, गुरुवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी केळी चिप्सच्या दुकानाला लक्ष्य केले. दुकानाचे कुलूप फोडून चोरट्यांनी तेलाचे तीन पिंपे तसेच केळी व बटाट्याच्या चिप्सची पाकिटे चोरून नेली. शुक्रवारी २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास दुकानमालक विनोद शिवादे दुकान उघडण्यासाठी आले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला.

विसापूर फाटा परिसरात गेल्या काही दिवसांपासून लहान व्यावसायिकांच्या दुकानांना चोरट्यांकडून लक्ष्य केले जात आहे. काही दिवसांपूर्वी याच परिसरातील झुणका-भाकर व चहाची टपरी चालविणारे सुभाष मानकर यांचे दुकानही फोडण्यात आले होते. आता केळी चिप्सच्या दुकानात चोरी झाल्याने परिसरातील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

विसापूर फाटा हा महामार्गालगतचा महत्त्वाचा व्यावसायिक परिसर असून, येथे अनेक नाश्ता सेंटर, चहाच्या टपऱ्या आणि लहान दुकाने आहेत. दिवसभर गजबजलेला हा परिसर रात्री मात्र असुरक्षित ठरत असल्याचे या घटनांवरून दिसून येत आहे. वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे छोट्या व्यावसायिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.





  Print






Related Photos