महत्वाच्या बातम्या

 आंतरराष्ट्रीय अंध अपंग दिन या पर्वावर मतदार जनजागृती कार्यक्रम संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : आंतरराष्ट्रीय अंध अपंग दिन या पर्वावर मतदार जनजागृती कार्यक्रम भंडारा जिल्ह्यातील भागीरता भास्कर अंध विद्यालय मधून मतदारांना मतदानाचे महत्त्व सांगून, EVM संबंधी तसेच मतदानाच्या वेळी हाताळायच्या संपूर्ण बाबींविषयी माहिती देऊन,मतदाराची ओळख पटविण्यासाठी आवश्यक असणारे विविध पुरावे कोणते यांची माहिती विषद करून यशस्वीपणे मतदार जनजागृती करण्यात आली.

मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत सांगितलेली माहिती विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांपर्यंत पोहचवावी व मतदारांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून द्यावी, असेही आवर्जून सांगण्यात आले.

या पर्वावर भंडारा जिल्हात मतदार जनजागृती कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नोडल अधिकारी सलामे E.O. (माध्य), विद्यालयाचे मुख्याध्यापक उमाप सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहकारी फसाटे, झुरमुरे, मरगडे, सावरकर, वैरागडे यांचे सहकार्य लाभले.





  Print






News - Bhandara




Related Photos