कस्तुरबा गांधी बालीका विद्यालय इंदाराम येथे चित्रकला स्पर्धेचे जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते बक्षिस वितरण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अहेरी :
इंदाराम येथे ७३ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त कस्तुरबा गांधी बालीका विद्यालयात चित्रकला परिक्षा घेण्यात आली होती . या परिक्षेत प्रथम द्वितीय ,  तृतीय क्रमांक पटकावलेल्या  विद्यार्थीना जिल्हा परिषद  उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले . यावेळी सरपंच गुलाबराव सोयाम, उपसरपंच वैभव कंकडालवार, ग्रा.प सदस्य तिरुपती मडावी, ग्रा.प सदस्य आयतुबाई सिडाम, पोलीस पाटील  सदाशिवराव दुर्गे, सुरेश कोतवाडलावार, वागाडे,  ढावस,वैद्य, उपस्थित होते .   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-16


Related Photos