महत्वाच्या बातम्या

 १० जानेवारीला रोजी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय अतर्गत नेहरु युवा केंद्र, च्या वतीने माय भारत विकसित भारत या विषयावर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन १० जानेवारी २०२३ ला करण्यात येणार आहे. 

जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड झालेल्या उमेदवार ना राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेता येईल. जिल्हयातील ग्रामीण भागातील युवक- युवतीनी सहभाग घ्यावा, असे आवाहन, श्रुती डोंगरे, जिल्हा युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र, यांनी कळविले आहे.

स्पर्धेचे नियम व अटी सर्वांना बंधनकारक राहतील. स्पर्धकांचे वय १५ ते २९ च्या आत असावेत. स्पर्धक भंडारा जिल्हयाचा रहिवासी असावा. आधार कार्ड झेरॉक्स डोमीसिल असावेत.

स्पर्धेची वेळ ७ मिनिटांची असेल, स्पर्धा ही हिंदी, इंग्रजी व मराठी भाषेत होणार आहे. यांची संबंधितांनी नोंद घ्यावी.

त्यामुळे अधिक माहितीसाठी नेहरु युवा केंद्र, भंडारा कार्यालयाला ८ जानेवारी २०२४ पर्यत संपर्क साधावा, तसेच जिल्हा युवा अधिकारी यांचे संपर्क क्रमांक ८४५९१७२२७५ रमेश अहिरकर ९९२११४७३३२ स्पर्धा धरकांनी संपर्क साधावा.





  Print






News - Bhandara




Related Photos