प्रशासक नेमलेल्या आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकावर पोस्को, अ‍ॅट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल


- मुख्याध्यापक फरार 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
  कुरखेडा तालुक्यातील अरततोंडी येथील  आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकावर  पोस्को, अ‍ॅट्रासिटी व विनयभंगाच्या कलमान्वये कुरखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र मुख्याध्यापक फरार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
 अरततोंडी येथील  आश्रमशाळेवर डिसेंबर २०१८ मध्ये प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली.   दरम्यान प्रशासकाचे शाळा प्रशासनावरील नियंत्रण सुटल्याने आश्रमशाळेत अनागोंदी कारभार सुरू झाला.  दरम्यान या आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाने विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची तक्रार कुरखेडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. पोलीसांनी चौकशीअंती मुख्याध्यापकावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान गुन्हा दाखल होताच मुख्याध्यापक फरार झाला. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी भंवर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
महादेवगड आश्रमशाळेचा यावर्षीचा दहावीचा निकाल केवळ १७ टक्के लागला. ४१ विद्यार्थ्यांपैकी केवळ ६ मुले व १ मुलगी असे ७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-12


Related Photos