आजचे दिनविशेष
१ जानेवारी महत्वाच्या घटना
१७५६ : निकोबार बेटे डेन्मार्कच्या ताब्यात गेली आणि त्यांना न्यू डेन्मार्क असे नाव देण्यात आले.
१८०८ : अमेरिकेत गुलामांच्या आयातीस बंदी घालण्यात आली.
१८१८ : भीमा कोरेगाव येथे एफ. एफ. स्टाँटन यांच्या नेतृव्ताखाली फक्त ५०० सैनिक असलेल्या दुसऱ्या बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री बटालियनने पेशव्यांच्या २५,००० सैन्याचा पराभव केला.
१८४२ : बाबा पद्मनजी यांचे ज्ञानोदय वृत्तपत्र सुरू झाले.
१८४८ : महात्मा जोतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भिडे वाडा पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरु केली.
१८६२ : इंडियन पिनल कोड अस्तीत्वात आले.
१८८० : विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गो. ग. आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापना केली.
१८८३ : पुणे येथे नूतन मराठी विद्यालयाची स्थापना.
१८९९ : क्यूबामधील स्पेनची राजवट संपुष्टात आली.
१९०० : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळ्याची स्थापना केली.
१९०८ : संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी हुबळी येथे ललित कलादर्श ही नाटक कंपनी स्थापन केली.
१९१९ : गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट अमलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली.
१९२३ : चित्तरंजन दास आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वराज्य पार्टीची स्थापना केली.
१९३२ : डॉ. नारायण परुळेकर यांनी सकाळ वृत्तपत्र सुरु केले.
१९९५ : WTO ची स्थापना झाली.
१९९५ : WTO ची स्थापना झाली.
१ जानेवारी जन्म
१६६२ : पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल १७२०)
१८७९ : ब्रिटिश साहित्यिक इ. एम. फोर्स्टर यांचा जन्म. (मृत्यू: ७ जून १९७०)
१८९२ : स्वातंत्र्य लढ्यातील नेते आणि महात्मा गांधींचे स्वीय सहाय्यक महादेव देसाई यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑगस्ट १९४२)
१८९४ : भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांचा जन्म. (मृत्यू: ४ फेब्रुवारी १९७४)
१९०० : आग्रा घराण्याचे गायक, शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू श्रीकृष्ण नारायण रातंजनकर यांचा जन्म. (मृत्यू: १४ फेब्रुवारी १९७४)
१९०२ : भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक कमलाकांत वामन केळकर यांचा जन्म. (मृत्यू: ६ डिसेंबर १९७१)
१९१८ : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी शांताबाई दाणी यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑगस्ट २००२)
१९२३ : अभिनेत्री व गायिका उमा देवी खत्री उर्फ टुन टुन यांचा जन्म. (मृत्यू: २४ नोव्हेंबर २००३)
१९२८ : लेखक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. मधुकर आष्टीकर यांचा जन्म. (मृत्यू: २२ मे १९९८)
१९३६ : साहित्यिक राजा राजवाडे यांचा जन्म. (मृत्यू: २१ जुलै १९९७)
१९४१ : चित्रपट कलाकार गोवर्धन असरानी ऊर्फ असरानी यांचा जन्म.
१९४३ : शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक, पद्मश्री, पद्मभूषण विजेते रघुनाथ माशेलकर यांचा जन्म.
१९५० : भारतीय वंशाच्या कॅनेडियन दिग्दर्शिका आणि पटकथालेखिका दीपा मेहता यांचा जन्म.
१९५१ : अभिनेते नाना पाटेकर यांचा जन्म.
१ जानेवारी मृत्यू
१५१५ : फ्रान्सचा राजा लुई (बारावा) यांचे निधन. (जन्म: २७ जून १४६२)
१७४८ : स्विस गणितज्ञ जोहान बर्नोली यांचे निधन.
१८९४ : जर्मन भौतिकशास्त्रज्ञ हेन्रिच हर्ट्झ यांचे निधन. (जन्म: २२ फेब्रुवारी १८५७)
१९४४ : दिल्लीचे नगररचनाकार सर एडविन लुटेन्स यांचे निधन. (जन्म: २९ मार्च १८६९)
१९५५ : भारतीय रसायनशास्त्रज्ञ डॉ. शांतिस्वरूप भटनागर यांचे निधन.
१९७५ : उद्योजक, साहित्यिक व चित्रकार शंकरराव वासुदेव किर्लोस्कर यांचे निधन. (जन्म: ८ ऑक्टोबर १८९१)
१९८९ : समाजवादी विचारवंत व पत्रकार दिनकर साक्रीकर यांचे निधन.
२००९ : संगीतकार, वादक व शास्त्रीय संगीतातील विद्वान रामाश्रेय झा यांचे निधन. (जन्म: ११ ऑगस्ट १९२८)
News - todayspecialdays