क्रांतिकारी बाबुराव शेडमाके शहीद दिनी शासकीय सुट्टी जाहीर करा : किशोर जोरगेवार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
वाघाच्या किर्रर्र जंगलात जाऊन वाघा समक्ष जंगल संपत्तीवर आपला उदरनिर्वाह करणारा हा धाडसी  समाज आहे. त्यामुळे या समाजाला कमजोर समजण्याची चुकी कोणी करु नये, हा समाज एकत्रित आला तर नवी क्रांती घडवू शकतो असे अनेक दाखले इतिहासात आहे. क्रांतिकारी बाबूरावजी शेडमाके यांच्या शुरतेचेहि दाखले इतिहासात आहे. २१ आँक्टोबर ला त्यांचा शहीद दिन आहे. देशासाठी त्यांचे योगदान लक्षात घेता या दिवसी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात यावी अशी मागणी किशोर जोरगेवार यांनी केली आहे. जागतिक मुळनिवासी गौरव दिन उत्सव समितीच्या वतीने आज शुक्रवारी जागतिक मूळ निवासी गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले होते. ते या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी, यंग चांदा ब्रिगेडचे अध्यक्ष, किशोर जोरगेवार यांची उद्घाटक स्थानी उपस्थिती होती. तर गोंडराजे विरेंद्रशहा आत्राम, यांची यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थिती होती. तसेच, पोलिस निरीक्षक बी.डी.मडावी, विज्ञान संस्थेचे  संचालक डॉ. रामदास आत्राम, गोंडीधर्म प्रचारक अर्चना खंडाते आदिंची विषेश अतिथी म्हणून याप्रसंगी उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलतांना जोरगेवार म्हणाले की, पारंपारिक संस्कृती प्रधान हा समाज आहे. या संस्कृतीचा विदेशातही प्रचार प्रसार करणे गरजेचे आहे. गोंड राज्याच्या राजवटीतील अनेक वास्तू आजही चंद्रपूरात ताठ मानेने उभे असून प्राचीन इतिहासाची साक्ष देत आहे. या वास्तूंचे सवर्धन करण्याची जबाबदारी समाज बांधवांनी हाती घेतली पाहिजे. या समाजात शिक्षणाचा अभाव दिसून येतो या बाबतही जोरगेवार यांनी चिंता व्यक्त करत समाजातील एकही विदयार्थी शिक्षणापासून वंचित राहायला नको असे आवाहणही जोरगेवार यांनी केले. हा समाज या जिल्ह्याचा मालक आहे. स्वंयरोजगारातून त्यांनी आता इतरांना रोजगार देत मालकाच्या भूमीकेत येणे गरजेचे आहे. हा गोंड राज्याचा जिल्हा असूनही समाजाचे एकही मोठे स्मारक येथे नाही. ही शोकांतीका आहे. त्यामूळे या समाजाला दिशा देणारे, त्यांच्या क्रांतीचा इतिहास दर्शविणारे भव्य स्मारक चंद्रपूरात उभारण्यात यावे अशी मागणीही या मंचावरुन जोरगेवार यांनी केली. २१ ऑक्टोबरला क्रांतीकारी बाबूरावजी शेडमाके यांचा शहीद दिन आहे. चंद्रपूरातील कारागृहात त्यांच्या स्मृती आहे. यादिवशी समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्रीत येऊन त्यांना श्रध्दांजली अर्पण करतात, त्यामूळे या दिवशी शासकीय सूट्ठी जाहिर करण्यात यावी अशी मागणीही यावेळी बोलतांना जोरगेवार यांनी केली.या समाजाच्या अनेक मागण्या शासन दरबारी प्रलंबीत आहे. त्या मागण्या नसून तो तुमचा अधिकार आहे. त्यासाठी संघर्श करा यात माझाही सक्रिय सहभाग असेल असा शब्द ही जोरगेवार यांनी या प्रसंगी समाज बांधवांना केला. या प्रसंगी बोलतांना पोलिस निरिक्षक बिडी मडावी यांनी समाजाला एकत्रीत येऊन हक्कासाठी लढण्याचे आवाहन केले. सामाजीक सुशिक्षीत युवकांनीही या लढ्यात सहभागी होऊन योगदान करावे अशी विनंती त्यांनी यावेळी बोलतांना समाज बांधवांना केली. संयुक्त राज्य संघाने संसदेत जगातील आदिवासी मागास जातींना मूळ निवासीचा दर्जा बहाल करुन विकासाच्या मूख्य प्रवाहात आणन्याचा ठराव एकमताने पारित केला आहे. त्याचे औचित्य साधून जिल्ह्यातील विविध गोंडीयन तथा आदिवासी सामाजिक संघटनांनी एकत्रीत येऊन आज शुक्रवारी गांधी चौक येथे गौरव दिन महोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी आदिवासी समाज बांधवाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यात महिलांची संख्या लक्षणीय होती  Print


News - Chandrapur | Posted : 2019-08-10


Related Photos