महत्वाच्या बातम्या

 वयाच्या १४ व्या वर्षापासून देशसेवेचे व्रत घेणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्रांतीचे धगधगते कुंड : प्रा. लक्ष्मीकांत कारिंगवार


- स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची प्रमुख उपस्थिती

- गडचिरोलीत सावरकर जयंतीनिमित्त जाहीर व्याख्यान संपन्न; देशप्रेमाचा जागर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर बहुउद्देशीय प्रबोधिनी, गडचिरोली यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे साहेब यांचे कर्तव्य कक्ष जनसंपर्क कार्यालय गडचिरोली येथे हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या कार्यक्रमाला माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

यावेळी प्रमुख वक्ते म्हणून नागपूर येथील प्रसिद्ध व्याख्याते तथा विचारवंत प्रा. लक्ष्मीकांत प्रकाशराव कारिंगवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनकार्यावर अत्यंत अभ्यासपूर्ण आणि प्रभावी मार्गदर्शन केले.

प्रा. कारिंगवार म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अवघ्या १४ व्या वर्षी भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःला अर्पण करण्याची प्रतिज्ञा घेतली होती. त्यांच्या जीवनातील प्रत्येक क्षण हा राष्ट्रसेवा, त्याग आणि संघर्षासाठी वाहिलेला होता. सावरकरांचे जीवन म्हणजे क्रांतीचे धगधगते कुंड असून त्यांचे विचार आजही तरुण पिढीला राष्ट्रभक्तीची प्रेरणा देतात.

त्यांनी सावरकरांच्या अंदमानातील काळकोठडीतील यातना, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान आणि त्यांच्या क्रांतिकारी विचारांचा सविस्तर ऊहापोह केला. देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाचे विचार समाजाने आत्मसात करणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल,” असेही ते यावेळी म्हणाले.

या व्याख्यान  कार्यक्रमाला प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनुसूचित जमाती मोर्चा भाजपा तथा माजी आमदार डॉ. देवरावजी होळी, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे, नगरपरिषद गडचिरोली बांधकाम सभापती तथा शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, जिल्हा संघचालक घिसुलाल काबरा, भाजपा राज्य परिषद सदस्य डॉ. चंदा कोडवते, जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे, जेष्ठ नेते सुधाकरजी येनगंदलवार यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रबोधिनीचे अध्यक्ष रमेश भुरसे, सचिव डॉ. भारत खटी, उपाध्यक्ष प्रमोद पिपरे आणि सहसचिव अॅड. निलकंठ भांडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

तसेच प्रबोधिनीचे सदस्य रविंद्र भांडेकर,. सुधाकर पेटकर आणि दिलीप मस्के यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या व्याख्यानाला गडचिरोली शहरातील देशभक्त नागरिक, युवक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून राष्ट्रभक्तीची भावना व्यक्त केली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos