तोडसा येथे विशेष सर्वेक्षण व सेवा संतृप्ती मोहिमेअंतर्गत बैठकीचे आयोजन

- प्रभारी जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांचे मार्गदर्शन; नागरिकांच्या समस्या जाणून प्रशासनाचा संवाद
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील दुर्गम तोडसा गावात विशेष सर्वेक्षण व सेवा संतृप्ती मोहिमेअंतर्गत शनिवार २३ मे २०२६ रोजी सायंकाळी गोटुल परिसरात महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस गडचिरोलीचे प्रभारी जिल्हाधिकारी नितीन गावंडे साहेब यांनी सदिच्छा भेट देऊन उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी एटापल्लीचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अमर राऊत सर, तहसीलदार हेमंत गांगुर्डे सर तसेच महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवांचे प्रतिनिधी यांनी उपस्थित राहून गावातील नागरिकांच्या विविध समस्या व अडचणी जाणून घेतल्या. प्रशासनाच्या विविध योजनांचा लाभ दुर्गम भागातील प्रत्येक गरजू नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
बैठकीदरम्यान ग्रामस्थांनी आरोग्य सेवा, महसूल विषयक समस्या, रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण तसेच विविध शासकीय योजनांबाबत आपल्या अडचणी मांडल्या. उपस्थित अधिकाऱ्यांनी संबंधित विभागांमार्फत तातडीने आवश्यक ती कार्यवाही करून समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले. तसेच शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती देत नागरिकांनी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
या बैठकीस नायब तहसीलदार धर्मेंद्र गायकवाड, मंडळ अधिकारी भूषण जवंजाळकर, ग्रामपंचायत तोडसा उपसरपंच प्रशांत आत्राम, ग्राम महसूल अधिकारी पल्लवी दडमल, तालुका वैद्यकीय अधिकारी भूषण चौधरी, वैद्यकीय अधिकारी राकेश नागोसे, सीडीपीओ एटापल्ली बुरीवार सर, गाव पाटील रैजु दसरू गावडे, मिरवा गावडे, राकेश बिरमवार, रैजु गावडे, किशोर गावडे, शिक्षक सुधाकर दुर्वा, कोमलसिंग गिरासे, देवाजी गावडे यांच्यासह गावातील स्थानिक नागरिक, महिला, अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
विशेष सर्वेक्षण व सेवा संतृप्ती मोहिमेमुळे दुर्गम व आदिवासी भागातील नागरिकांना शासकीय सेवा थेट उपलब्ध करून देण्यास मदत होत असून प्रशासन व नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होत असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.
News - Gadchiroli




Petrol Price




