महत्वाच्या बातम्या

 चातगाव येथे अवैध मुरूम वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल पथकाकडून जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालूका प्रतिनिधी / धानोरा : तालुक्यातील चातगाव येथे विनापरवाना व बेकायदेशीररी्या मुरूम तस्करी करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर महसूल विभागाच्या पथकाने १९ जून रोजी धडक कारवाई करत ते जप्त केले. चातगाव परिसरातून कोणतीही रॉयल्टी न भरता मुरुमाची अवैध वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती तहसीलदारांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे तहसीलदारांच्या आदेशावरून महसूल पथकाने परिसरात सापळा रचला. दरम्यान, मुरुमाने भरलेले ट्रॅक्टर जात असताना पथकाने ते थांबवून तपासणी केली. 

यावेळी पथकातील अधिकाऱ्यांनी ट्रॅक्टर चालकाकडे मुरुमाच्या वाहतुकीबाबतचा रीतसर परवाना (रॉयल्टी पास) मागितला; मात्र चालकाला कोणताही परवाना सादर करता आला नाही. यामुळे सदर मुरुमाची वाहतूक पूर्णपणे अवैध असल्याचे स्पष्ट झाले. महसूल पथकाने तात्काळ कारवाई करत मुरुमासह ट्रॅक्टर ताब्यात घेतले आणि ते धानोरा येथील तहसील कार्यालयात जमा केले.

महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे तालुक्यातील अवैध गौण खनिज तस्करांचे धाबे दणाणले असून, प्रशासनाने यापुढेही अशीच कडक कारवाई सुरू ठेवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos