महत्वाच्या बातम्या

 दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हस्ते क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन


- दिव्यांग क्रिडास्पर्धांना उत्साहात सुरूवात

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : दिव्यांग विदयार्थी-विदयार्थ्यांच्या क्रिडा स्पर्धांना आज शिवाजी क्रिडा संकुल येथे उत्साहात सुरूवात झाली. विशेषत दिव्यांग विदयार्थ्यांच्या हस्तेच या स्पर्धांचे दिपप्रज्वलन करण्यात आले.तसेच उपस्थित मान्यवर व दिव्यांग खेळाडुच्या हस्ते हवेत रंगीबेरंगी  बलुन आकाशात सोडुन स्पर्धेला सुरवात करण्यात आली.

जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयामार्फत आज शिवाजी क्रीडा संकुल येथे या स्पर्धांचे आयोजन आज व उद्या २९ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे.

जागतिक दिव्यांग दिनाचे व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा २०२३ -२४ चे औचित्य साधुन समाज कल्याण समिती जिल्हा परिषद,भंडाराचे विद्यमाने,जिल्हा समाज कल्याण अधिकारी,जिल्हा परिषद,भंडारा यांचे अधिनस्त कार्यरत शासकीय,अनुदानित,विना अनुदानित व कायम विना अनुदानित दिव्यांग शाळा व कर्मशाळातील  विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धा व सास्कृंतिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

या कार्यक्रमाला मुख्य अतिथी अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उमेश नंदागवळी, गटविकास अधिकारी डॉ.संघमित्रा कोल्हे, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ–दांदळे व समाजकल्याण अधिकारी जि.प मनिषा कुरसुंगे उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात गेल्या पाच वर्षापासुन या स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात येत असुन त्या व्दारे दिव्यांग खेळाडुना प्रोत्साहन देण्यात येते. तसेच जिल्हास्तरावरील विदयार्थ्याना राज्य स्तरावरील स्पर्धात पाठविण्यात येते असे श्रीमती कुरसुंगे यांनी सांगितले.

भंडारा जिल्हयातील १८ दिव्यांग शाळा, महाविदयालयातील सर्व विदयार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. गेल्या वर्षीच्या राज्यस्तरीय स्पर्धेत १६ सुवर्णपदक जिल्हयातील दिव्यांग खेळाडुंनी पटकावले होते.
दिव्यांग क्रीडा स्पर्धेत आज लांब उडी, गोळा फेक, धावणे, या सर्व प्रकारात कर्णबधीर, मुकबधीर, मतीमंद तसेच अस्थीव्यंग खेळाडुनी सहभाग घेतला.





  Print






News - Bhandara




Related Photos