महत्वाच्या बातम्या

 प्रेम काय असते आणि काय नसते ?


प्रेम हे प्रेम नसते,
निकोप प्रेमाची जाणं नसते,
फक्त शारीरिक तेवढं आकर्षण असते.
प्रेम हे प्रेम नसते !! (1)
प्रेम हे अडीच अक्षरी शब्द असतात,
या शब्दाला पूर्ण करण्यासाठी
नवतरुणांची धाव असते,
प्रेम हे प्रेम नसते !! (2)
प्रेम हे प्रेम नसते, खोटे वादे आणि खोटे रष्मानी भरलेली
तरुणाईच्या मनातील शब्दाची खाणं असते,
मुलीच्या मनाचा ठाव घेणारी ही एक मूकठी बोली असते
प्रेम हे प्रेम नसते !! (3)
दोन मनाला जाणून घेणारी समज नसते,
फक्त तुझ्याशिवाय राहू शकत नाही
याचं शब्दाचा लिलाव करणारी
एक भावूक मनाची भाषा असते
प्रेम हे प्रेम नसते !! (४)
प्रेम म्हणजे तरुणाच्या तरुणाईची एक प्रक्रिया असते
विरुद्ध लिंगी आकर्षण असते.
समजून घेतलं तर पवित्र असते,
नाही तर विकृतीचा भाग असते,
प्रेम हे प्रेम नसते !! (५)
प्रेमासाठी तरुणाई धुंद वेडे होतात
एकटेपणा राहवत नाही म्हणून, मध्यम शोधत असतात,
अवधानाने घडलेल्या विपरीत परीणामामुळे,
पश्चाताप करत जीवन जगत असतात,
प्रेम हे प्रेम नसते !! (६)
प्रेम कसे असावे, प्रेमामध्ये लिलाव नसावे,
माणूस माणुसकीला समजून घेणार माणूसपण असावे,
प्रेम हे प्रेम असावे, सारे काही सेम असावे,
प्रेम हे प्रेम असावे, प्रेमामध्ये त्याग समर्पण नसावे,
प्रेमामध्ये सचोटी, प्रामाणिक आणि पवित्र अशा धाग्यांची घट्ट अशी विन असावी,
प्रेम हे प्रेम असावे !! (8)

- संगिता तुमडे, कुरखेडा





  Print






News - Editorial




Related Photos