नाल्यात पडून आपापल्ली येथील विद्यार्थीनीचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
विशेष प्रतिनिधी / अहेरी :
तालुका मुख्यालया पासून १५ कीलोमीटर अंतरावर असलेल्या  आपापल्ली येथील विद्यार्थीनी राजे धर्मराव कनिष्ठ महाविद्यालय महागाव येथे सकाळी साडे सात वाजता जात असताना  आपापल्ली - सुभाषनगर च्या मधात असलेल्या नाल्यावर  तोल गेल्याने पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

शेवंता गणपत सातपूते असे मृतक विद्यार्थिनीचे नाव आहे. शेवंता  ही इयत्ता बारावीत शिकत होती.  ती सकाळी आपल्या स्वगावाहून महागावला शाळेत जाण्यासाठी निघाली असता गावाजवळील नाल्यात प्रथम तीची सायकल पडली. आपली सायकल वाहत जाणार म्हणून ती सायकल पकडण्यासाठी गेली असता मागुन आलेल्या पाण्याच्या प्रवाहाने ती नाल्यात खाली पडून वाहत गेली. तिचा मृतदेह वाहत जावून मुक्तापूर जवळील नात्याच्या  पुलाला अडकला.  याबाबतची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांना मिळताच त्यानी सदर माहिती पोलिस ठाणे अहेरीला देवून ते घटनास्थळी पोहचले.व मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यासाठी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना  कामाला लावले. घटनेचा पुढील तपास  पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनात साहाय्यक पोलिस निरीक्षक शिंदे हे करीत आहेत.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-07


Related Photos