महत्वाच्या बातम्या

 २० डिसेंबर ला नागपुरात वैदयकिय व विकी प्रतिनिधीचा अखिल भारतीय संप यशस्वी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : फेडरेशन ऑफ मेडीकल अँन्ड रिप्रेझेन्टेटीव्हज् असोसिएशन्स ऑफ इंडीया (FMRAI) च्या वतीने पुर्ण देशभरातील २ लाखाच्या वर मेडीकल स्प्रेिझेन्टेटिव्हज् हे बुधवार २० डिसेंबर ला, सर्वसामान्य जनतेच्या औषधी विषयी मागण्या व वैदयकिय व विकी प्रतिनिधींच्या अशा आठ सुत्री मागण्यांना घेवून संपावर होते.

केंद्रातील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे सर्वसामान्य कामगार व शेतकरी हयांच्या हक्कांवर गदा येत चाललेली आहे. तसेच सर्वसामान्य जनतेवर महागाईचा बोझा लादण्यात येत आहे. औषधांच्या किमती हया जीएसटी मुळे तसेच औषधांवरील किमतीवर नियत्रण न राहिल्यामुळे औषधे सर्वसामान्यांना परवडेनाशी झालेली आहेत. त्यात औषधांवर जीएसटी हा ५ ते २० टक्क्यांपर्यंत लावल्यामुळे औषधे हि महाग होत चाललेली आहेत. तसेच मेडीकल इम्प्लॉट जसे हृदय रोग, गुडघे व कंबर हयातील साधने हयावर जीएसटी मुळे हया जीवनावश्यक औषधे व वस्तू महाग आहेत.

संपातील सर्वसामान्य जनतेच्या मागण्या हया संपामध्ये औषध विषयक मागण्या : १. औषधांवरील जीएसटी रद्द करा. २. मेडीकल इम्प्लांट वरील जीएसटी रद्द करा, औषधांच्या भ्रष्ट विपणन पध्दतीवर आळा घालण्याकरीता कायदा करा व त्याची कडक अंमलबजावणी करा. 

कामगार कायदे विषयक मागण्या : चार कामगार विरोधी श्रम कोड बिल रद्द करा विक्री संवर्धन कर्मचाऱ्याकरीता कामाच्या स्वरुपासाठी नियम तयार करा. विक्री संधर्धन कर्मचारी कायद्या पूर्ववत करा.

औषध उद्योगांकडे मागण्या : विकीचे उदिष्टांसाठी वैदयकिय व विकी प्रतिनिधीची प्रताडणा बंद करा वैदयकिय व विक्री प्रतिनिधीच्या व्यक्तिगत गोपनियते मध्ये मोबाईल व इतर साधनांव्दारे हस्तक्षेप बंद करा, वैदयकिय व विकी प्रतिनिधीना सरकारी इस्पितळांमध्ये कार्य करण्यासाठी बंदी रद्द करा. 

वरील मागण्यांकरीता नागपूर मधील १ हजार चे वर वैदयकिय व विकी प्रतिनिधी आज संपावर होत. संपाच्या सफलते करीता महाराष्ट्रभर भित्ती फलके, पत्रके, नुक्कड सभा आदीव्दारे प्रचार सभा घेण्यात आल्यात व आज बुधवारी संदेश दवा बाजार, गंजीपेठ येथे दुपारी १ ते ३ या वेळेत धरणा प्रदर्शन करण्यात आले व ईमेल व्दारे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले. धरणा कार्यक्रमात नितीन ढोबळे सचिव, कॉ. अभिजीत कुलत, विभागीय सचिव, दिलीप देशपांडे, राज्य उपाध्यक्ष, वैभव जोगळेकर, अजय ताडपिल्लेवार, घनश्याम देशमुख, चंद्रशेखर मालविय, आदीनी केले. कार्यक्रमात महिला वैदयकिय प्रतिनिधी अंजुम शेख, यामीनी निखारे, अर्चना मांडवगडे, मनाली वैदय, ललीता बर्वे सहभागी होत्या. संप यशस्वी करण्याकरीता राजेश मानेकर, धीरज मून, योगेश चन्ने, गोपाल मौर्या, संदीप श्रीरसागर, राज चव्हाण, रवि, कमलेश शाहु, निलेश पाटील, चंद्रशेखर शर्मा, अमोल पलांडे, प्रेम बोरीकर, श्रीकांत आसरे आदीनी परिश्रम घेतलेत. असे सचिव नितिन ढोबळे यांनी सांगितले.





  Print






News - Nagpur




Related Photos