महत्वाच्या बातम्या

 शिक्षकांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार : पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात शिक्षकांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
तळोधी बा.पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील एका शासकीय शाळेतील शिक्षकाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीची छेळछाळ केल्याने पीडितेच्या पालकांच्या तक्रारीवरून शिक्षक रविन्द्र पांडुरंग नन्नावरे वय (५६) यांचेवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या घटनेची माहिती होतात परिसरात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
या शिक्षकाने दुपारच्या ४ वाजता खेळण्यासाठी सुट्टी दरम्यान शाळेत शिकणारी अल्पवयीन (१०) वर्ष मुली सोबत छेडछाड केली. ही बाब बालिकेच्या पालकांना माहिती होतात पालकांच्या तक्रारीवरून तळोधी बा.पोलीस येथे अपराध क्र.३००/२०२३ कलम ३५४ अ भांदवी सहकलम ८,१० पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

तळोधी बा.पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मंगेश भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भाष्कर पिसे तपास करीत आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos