महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


२२ नोव्हेंबर महत्वाच्या घटना

१८५७ : कोलोराडो मधील डेनव्हर शहराची स्थापना.

१९४३ : लेबनॉन फ्रान्सपासुन स्वतंत्र झाला.

१९४८ : मुंबई शहराला चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा.

१९५६ : ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न येथे १६ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

१९६३ : थुंबा या भारतीय अग्निबाण प्रक्षेपण केंद्राचे उद्‍घाटन.

१९६३ : अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या.

१९६८ : द बीटल्स यांनी द बीटल्स (द व्हाईट अल्बम) प्रकाशित केला.

१९८६ : भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी श्रीलंकेविरुद्ध कसोटीत ३४वे शतक केले.

१९९१ : डहाणूजवळ ज्वालाग्राही रसायने वाहून नेणारा टँकर पेटून रॉकेल मिळण्याच्या आशेने आलेल्या ६१ आदिवासींचा होरपळून मृत्यू.

१९९७ : नायजेरियात मिस वर्ल्ड स्पर्धेवरील हल्ल्यात १०० ठार.

२००५ : अँजेला मार्केल या जर्मनीच्या पहिल्या महिला चॅन्सेलर बनल्या.

२०१३ : भारताच्या विश्वनाथन आनंदला पराभूत करुन नॉर्वेचा २२ वर्षीय मॅग्नस कार्लसन हा सर्वात लहान वयाचा बुद्दीबळ विश्वविजेता बनला.

१९६५ : संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) स्थापना झाली.

१८५८ : कोलोराडो मधील डेनव्हर शहराची स्थापना.

२२ नोव्हेंबर जन्म

१८०८ : पर्यटन व्यवस्थापक थॉमस कूक यांचा जन्म. (मृत्यू: १८ जुलै १८९२)

१८७७ : एफ.सी. बार्सिलोनाचे संस्थापक जोन गॅम्पर यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९३०)

१८८० : धर्मरहस्यकार केशव लक्ष्मण दफ्तरी यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर १९५६)

१८८५ : पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार हिराबाई पेडणेकर यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑक्टोबर १९५१)

१८९० : फ्रेन्च राष्ट्राध्यक्ष आणि सेनापती चार्ल्स द गॉल यांचा जन्म. (मृत्यू: ९ नोव्हेंबर १९७०)

१९०९ : स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, समाजसेवक आणि पत्रकार द. शं. तथा दादासाहेब पोतनीस यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑगस्ट १९९८)

१९१३ : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ, मुत्सद्दी, कुशल प्रशासक, रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. लक्ष्मीकांत झा यांचा जन्म. (मृत्यू: १६ जानेवारी १९८८ – पुणे)

१९१५ : चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक किशोर साहू यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट १९८०)

१९२२ : साहित्यिक त्र्यं. वि. सरदेशमुख यांचा जन्म.

१९२६ : मेडएक्स कॉर्पोरेशनचे संस्थापक आर्थर जोन्स यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑगस्ट २००७)

१९३९ : उत्तर प्रदेशचे ज्येष्ठ नेते मुलामसिंह यादव यांचा जन्म.

१९४३ : अमेरिकन लॉनटेनिस पटू बिली जीन किंग यांचा जन्म.

१९६७ : टेनिसपटू बोरिस बेकर यांचा जन्म.

१९६८ : पीएचपी (PHP) प्रोग्रामिंग लँग्वेजचे निर्माते रासमुस लेर्दोर्फ यांचा जन्म.

१९७० : श्रीलंकेचा क्रिकेट कर्णधार मार्वन अट्टापट्टू यांचा जन्म.

१९८० : नेपस्टरचे संस्थापक शॉन फॅनिंग यांचा जन्म.

१९४८ : हिंदी चित्रपटसृष्टीतील नृत्य कोरियोग्राफर - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते सरोज खान यांचा जन्म (मृत्यू : ३ जुलै २०२०)

१८९८ : अमेरिकन वैमानिक आणि जगाची परिक्रमा एकट्याने उड्डाण करणारे पहिले वैमानिक विली पोस्ट यांचा जन्म (मृत्यू : १५ ऑगस्ट १९३५)

१८६९ : फ्रेंच कादंबरीकार, निबंधकार आणि नाटककार - नोबेल पारितोषिक विजेते आंद्रे गिडे यांचा जन्म (मृत्यू : १९ फेब्रुवारी १९५१)

१६०२ : स्पेन आणि पोर्तुगालची राणी फ्रान्सची एलिझाबेथ यांचा जन्म (मृत्यू : ६ ऑक्टोबर १६४४)

२२ नोव्हेंबर मृत्यू

१९०२ : जर्मन उद्योगपती फ्रेडरिक क्रूप्प यांचे निधन. (जन्म: १७ फेब्रुवारी १८५४)

१९२० : कवी व संपादक एकनाथ पांडुरंग रेंदाळकर यांचे निधन.

१९४४ : खगोलशास्त्रज्ञ सर आर्थर एडिग्टन यांचे निधन.

१९५७ : नाट्यकर्मी पार्श्वनाथ आळतेकर यांचे निधन. (जन्म: १४ सप्टेंबर १८९७)

१९६३ : इंग्लिश लेखक अल्डस हक्सले यांचे निधन. (जन्म: २६ जुलै १८९४)

१९६३ : अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या. (जन्म: २९ मे १९१७)

१९८० : हॉलिवूडमधील अभिनेत्री, गायिका, संवादलेखिका व सौंदर्यवती मे वेस्ट यांचे निधन. (जन्म: १७ ऑगस्ट १८९३)

२००० : अणूरसायनशास्त्रज्ञ, प्राध्यापक डॉ. हरी जीवन तथा एच. जे. अर्णीकर यांचे निधन. (जन्म: ६ ऑक्टोबर १९१२)

२००२ : हैदराबाद मुक्तिसंग्रामचे अध्वर्यू गोविंदभाई श्रॉफ यांचे निधन.

२००८ : गीतकार रविंद्र सदाशिव भट यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १९३९)

२०१२ : मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते पी. गोविंद पिल्लई यांचे निधन. (जन्म: २३ मे १९२६)

२०१६ : भारतीय गायक एम. बालमुलकृष्ण यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १९३०)

२००६ : भारतीय रसायनशास्त्र - पद्म भूषण, शांती स्वरूप भटनागर पुरस्कार आसिमा चॅटर्जी यांचे निधन (जन्म: २३ सप्टेंबर १९१७)

१९८१ : जर्मन चिकित्सक आणि बायोकेमिस्ट - नोबेल पुरस्कार विजेते हॅन्स अॅडॉल्फ क्रेब्स यांचे निधन (जन्म: २५ ऑगस्ट १९००)





  Print






Related Photos