विक्रीसाठी साठवलेला सुगंधित तंबाखू व सुपारी जप्त

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भद्रावती : विजासन येथे विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या साठवून ठेवलेला १५ हजार ८८० रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू व सुपारीचा साठा पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई नेताजीनगर, विजासन येथील नीता संजय चव्हाडे ४० वर्षे यांच्या घरी करण्यात आली.
पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे संबंधित महिलेच्या घराची झडती घेतली. यावेळी घरात मजा १०८ कंपनीचे २० डबे सुगंधित तंबाखू आढळून आले. या तंबाखूची किंमत १४ हजार ८२० रुपये, तर १ हजार ६० रुपये किमतीची सुपारी असा एकूण १५ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
विक्रीच्या उद्देशाने सुगंधित तंबाखू व सुपारीचा बेकायदेशीर साठा करून ठेवल्याप्रकरणी तसेच अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून संबंधित महिलेविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिला आरोपी असल्याने पोलिसांनी तिला अटक न करता चौकशी व पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी पोलिस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.




Petrol Price




