महत्वाच्या बातम्या

 वर्धा लोकसभा क्षेत्रातील रेल्वेस्थानकावरील प्रलंबीत रेल्वे थांबे पुर्ववत करावे : खा. रामदास तडस यांची लोकसभेत मागणी


- नियम ३७७ अंतर्गत उपस्थित केला मुद्दा. 

- जेष्ठ नागरिकांच्या रेल्वे सुविधा त्वरित प्रभावाने पुन्हा लागू करावे. 

- हावडाहून पुण्याकडे जाणाऱ्या दुरांतो एक्स्प्रेसला वर्धा येथे थांबा मंजूर करण्याची केली मागणी. 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली (वर्धा) : कोविड-१९ महामारी अगोदर विविध मेल/एक्सप्रेस गाडयांचे थांबे सिंदी रेल्वे, तुळजापूर, सेवाग्राम, हिंगणघाट, वर्धा, पुलगांव, धामणगांव, चांदूर, वरुड (ऑंरेज सिटी), मोर्शी या रेल्वे स्थानकावर सुरु होते, परंतु कोविड-१९ महामारी मुळे सर्व थांबे रद्द करण्यात आलेले होते, रद्द झालेले थांबे पुर्ववत करण्यासाठी अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आलेले होते, काही रेल्वे गाडयाचे थांबे सुरु झालेले आहे, परंतु अद्यापही काही रेल्वेस्थानकावरील थांबे प्रलंबीत आहे, तसेच जेष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा सुरु झालेल्या नाही, वर्धा लोकसभा क्षेत्रातील प्रवासी संटना, विविध ठिकाणचे प्रवासीवर्ग व नागरिक यांनी रेल्वे थांबे, तसेच विविध समस्या संबधीत खासदार रामदास तडस यांना अवगत केले, प्रवासी वर्ग व नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन आज खासदार रामदास तडस यांनी नियत ३७७ अंतर्गत रेल्वे विविध विषया संबधीत मुद्दा उपस्थित करुन लोकसभेचे लक्ष वेधले.

वर्धा लोकसभा मतदारसंघमाध्यम वर्धा मधील वर्धा आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये एकूण १३ मोठी रेल्वे स्थानके आहेत, या रेल्वेस्थानकावरुन दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. कोविडपूर्वी अनेक गाड्यांचा थांबा सुरळीत सुरु होता, परंतु कोविडमुळे संपुर्ण भारतातील सर्व रेल्वेस्थानकावरील रेल्वे थांबे बंद करण्यात आले होते, त्यामुळे वर्धा लोकसभा क्षेत्रातील सर्व थांबे रद्द झालेले होते, परंतु २०२२ मध्ये रेल्वे सुरळीत सुरु झाल्यानंतर कोविडच्या पुर्वी असणारे वर्धा लोकसभा क्षेत्रातील अनेक रेल्वे गाडयांचे थांबे अद्यापही प्रलंबीत आहे कोविडपूर्वी सर्व रेल्वे स्थानकांवर थांबणाऱ्या सर्व गाड्या पुर्ववत करावे. तसेच वर्धा ते पुणे दरम्यान नवीन दैनंदिन रेल्वे सेवा सुरू करावी. हावडाहून पुण्याकडे जाणाऱ्या १२२२२/१२२२३ दुरोंतो एक्स्प्रेसला वर्धा येथे थांबा मंजूर करावा. कोविड काळात ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या रेल्वे सुविधा स्थगित करण्यात आलेल्या होत्या त्या जेष्ठ नागरिकांच्या सुविधा त्वरित प्रभावाने पुन्हा लागू करण्याची विनंती लोकसभेच्या माध्यमातुन नियम ३७७ अंतर्गत रेल्वेमंत्री यांना केली.

कोविड-१९ महामारीनंतर अनेक रेल्वे सेवा पुर्ववत सुरळीत सुरु झाल्या आहेत, परंतु वर्धा लोकसभा क्षेत्रातील अनेक रेल्वेस्थानकावरील रेल्वे थांबे प्रलंबीत आहे, तसेच पुणे येथे विदर्भातील जाणारी संख्या जास्त आहे, यासाठी वर्धा ते पुणे दरम्यान नवीन दैनंदिन रेल्वे सेवा सुरू करणे आवश्यक आहे, हावडा येथून पुणे येथे जाणाऱ्या १२२२२/१२२२३ दुरोंतो एक्सप्रेसला नागपूर नंतर स्टॉपेज नसल्यामुळे पुणे येथे जाण्यासाठी एक पर्याय म्हणून वर्धा येथे थांबा मिळणे आवश्यक आहे, यासाठी हावडाहून पुण्याकडे जाणाऱ्या १२२२२/१२२२३ दुरोंतो एक्स्प्रेसला वर्धा येथे थांबा मंजूर व्हावा व जेष्ठ नागरिकांना सुविधा मिळणाऱ्या सुविधा पुर्ववत सुरु व्हावे. या दृष्टीकोनातुन आज लोकसभेमध्ये रेल्वे संबधीत मुद्दे उपस्थित केले असल्याचे यावेळी खासदार रामदास तडस म्हणाले.





  Print






News - World




Related Photos