महत्वाच्या बातम्या

 कोविड काळात कोविड नियमाचे पालन न केल्याने दाखल झालेले गुन्हे सरकारच्या वतीने मागे घेण्यात यावे


- नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खासदार रामदास तडस यांनी भेट घेऊन केली सवीस्तर चर्चा

- वर्धा लोकसभा क्षेत्रातील विविध विषयासंदर्भात सकारात्मक चर्चा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : वर्धा लोकसभा क्षेत्रातील विविध विकास कामे, अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांना मदत, कोविड काळात कोविड नियमाचे पालन न केल्याने दाखल झालेले गुन्हे सरकारच्या वतीने मागे घेण्याबाबत, राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत कंत्राटी नर्सेस (आरबीएसके) शहरी ग्रामिण एएनएम/जीएनएम/एलएलव्ही/प्रयोगशाळा तंत्रज्ञ/औषध निर्माण अधिकारी /वैद्यकीय अधिकारी व एनयुएचएम अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांचा विचार करून रिक्त पदावर समायोजन करण्याबाबत, तसेच विविध विषया संदर्भात आज नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्धा लोकसभा मतदार क्षेत्राचे खासदार रामदास तडस यांनी भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले.

कोविड (कोरोना) चे संकट आटोक्यात आणण्यासाठी सरकारच्या वतीने त्यावेळी युद्ध पातळीचे प्रयत्न करण्यात आले सोबतच या संकटास आटोक्यात आणण्या करिता शासनाने कोविडच्या नावाखाली विविध प्रतिबंध लावले होते व या प्रतिबंधाचे (नियमाचे) उल्लंघन करण्याऱ्यावर भारतीय दंड संहिता, आपत्ती व्यवस्थापन व इतर नियमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले असून सदरच्या केसेस अद्यापही कोर्टात सुरू आहेत, कोविड काळात खचलेल्या जनसामान्यांना या केसचा त्रास होत. असल्यामुळे कोविड काळात आपत्ती व्यवस्थापन संदर्भातील गुन्हे माग घ्यावे, तसेच कोविड काळात आपल्या जिवाची व  कुटुंबाची पर्वा न करता देवदूतासारखे कोविड महामारीवर मात करण्याकरिता राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी आरोग्य सेविका/सहाय्यीका प्रयोग तंत्रज्ञ/ औषधी निर्माण अधिकारी/वैद्यकीय अधिकारी इत्यादी संवर्गात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी रात्रदिवस आरोग्य सेवा दिलेली त्या सर्व कर्मचाऱ्यांना रिक्त पदावर समायोजन करण्याबाबत व महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ मर्यादित मधील अधिकारी/कर्मचारी संघटने संबधीत विषय, इतर महत्वाच्या विषयावर चर्चा केली व निवेदनाच्या अनुषंगाने प्रश्न सोडविण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

कोविड काळात कोविड नियमाचे उल्लघंन केल्यामुळे अनेक नागरिकांवर भारतीय दंड संहिता, आपत्ती व्यवस्थापन व इतर नियमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे, त्या गुन्हयामुळे अनेक सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, त्यामुळे सर्व गुन्हे सरकारच्या वतीने मार्ग घेणे आवश्यक असल्याचे यावेळी खासदार रामदास तडस म्हणाले.





  Print






News - Wardha




Related Photos