महत्वाच्या बातम्या

 वडसा, ब्रम्हपुरी व नागभीड स्टेशनवर रेल्वे तिकीट ऑफलाइन करा


- केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे खा. नेते यांची मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : खासदार अशोक नेते यांनी नागभीड, ब्रम्हपुरी, वडसा या स्टेशनवर व गडचिरोली येथे अनारक्षित रेल्वे तिकीट ऑफलाइन करण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे त्यांची भेट घेत चर्चा करून निवेदनातून केली आहे.

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील रेल्वे प्रवाशांच्या संबधित अडचणी लक्षात घेता मागच्या आठवड्यापासून सर्व अनारक्षित रेल्वे तिकिटे ऑनलाइन करण्यात आली आहेत. रेल्वे प्रशासनाने सर्व तिकीट काउंटर बंद केले आहेत. मात्र, ग्रामीण भागातील प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रवाशांना त्यांचे मोबाइल यूटेस ॲप मोबाइल डाउनलोड करून रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे तिकीट काढण्यास सांगितले जात आहे. 

सर्व रेल्वे तिकीट काउंटरसमोर वेळेवर ऑनलाइन यूटेस ॲपचे बोर्ड लावण्यात आले आहेत. तुम्हाला तुमच्या मोबाइलवर व यूटेस अॅप डाउनलोड करून रेल्वेचे तिकीट काढावे लागेल. ग्रामीण भागात ही पद्धत अत्यंत अवघड आणि असामान्य आहे, ती नागरिकांच्या समजण्याच्या पलीकडची आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची अडचण दूर करण्यासाठी रेल्वे आहे.

तिकीट ऑफलाइन करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आणलेल्या यूटेस मोबाइल ॲपचा वापर करावा, याकरिता खासदार अशोक नेते यांनी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील नागभीड, ब्रम्हपुरी, वडसा या स्टेशनवर व गडचिरोली येथे अनारक्षित रेल्वे तिकीट ऑफलाइन करण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos