महत्वाच्या बातम्या

 खैरे कुणबी समाजाचा स्नेहमिलन सोहळा उत्साहात संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : हनुमान मंदिर तेलंगखेडी नागपूर येथे ३ नोव्हेंबर २०२३ रोज रविवार आयोजित खैरे कुणबी समाज पश्चिम नागपूर च्यावतीने स्नेह मिलन मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विकास ठाकरे आमदार पश्चिम नागपूर, राजुऱ्याचे आमदार सुभाष धोटे, अशोक शिंदे माजी राज्यमंत्री, देवराव रडके, माजी आमदार कामठी, डी.के. आरीकर चंद्रपूर, एडवोकेट दिगंबर गुरपुडे, चंद्रपूर जिल्हा माजी अध्यक्ष स्वप्निल मोंढे अध्यक्ष खैरे कुणबी सुधारक संस्था नागपूर, गुणेश्वर आरीकर विदर्भ खैरे कुणबी समाज अध्यक्ष, निलेश महाजन, कृष्णा निसार, प्रेम झाडे माजी नगराध्यक्ष वाडी, शाहूराव भोयर अमरावती आणि समाजातील गणमान्य व्यक्ती व इतर समाज बांधव कार्यक्रमाला उपस्थित होते.  

संचालन निखिल राऊत यांनी केले तर प्रास्ताविक पश्चिम चे अध्यक्ष मोहन डंबारे यांनी केले. आभार कावळे यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजक महादेव वैद्य, सदस्य रमेश चौधरी, ज्ञानेश्वर शेंडे, सुनील मगरे, रमेश चौधरी, राजेंद्र महाजन, सुरेंद्र पुणेकर, दिगंबर शेंडे, अंबादास शेंडे, महेश वासुरके, मनोहर बारई, विजय शिवणकर, भगवान कारेमोरे इतर संघटक डॉ. प्रदीप महाजन, राम रतन देशमुख, टेमराज माले नितीन तुंबडे, नंदिनी जवादे, रेखा डोंगरे, सुषमा रडके तसेच सर्व समाज बांधव यांनी सहकार्य केले.





  Print






News - Nagpur




Related Photos